तालुक्यातील गांगलवाडी ते मुडझा मार्गावर आज दिनांक 25 जूनला सकाळच्या सहा वाजताच्या सुमारास रेती वाहतूक करीत असलेला ट्रक बरडकिन्ही गावाजवळ खड्ड्यात फसल्याने या मार्गावरून येणाऱ्या वाहन चालकांना १० तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे.
वाहतूक ठप्प झाल्याने या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली
हळदा आवळगाव मार्गाने गांगलवाडीच्या दिशेने रेती वाहतूक करीत असलेला ट्रक (mh २९ bd ७९८२ ) बरडकिन्ही गावाजवळ सकाळी सहाच्या सुमारास रस्त्याच्या मधोमध असलेल्या खड्ड्यामध्ये फसल्याने वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली. गांगलवाडी मुडझा मार्गाने जड वाहतूक होत असल्याने रस्त्याला जागोजागी खड्डे पडले आहेत. निवडणुकीपूर्वीच आमदार विजय वडेट्टीवार यांनी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले. वर्षभरापासून या रस्त्याचे काम सुरू आहे, मात्र रस्त्याच्या कामाला गती मिळत नसल्याने जागोजागी पडलेल्या खड्ड्यांचा त्रास येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना करावा लागत आहे. काल रात्रभर पाऊस आल्याने रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचलेला असल्याने वाहन चालकाला त्याचा अंदाज न आल्याने खड्ड्यांमधून गाडी गेल्याने पूर्णतः ट्रक रस्त्याच्या मधोमध फसला. सकाळपासूनच वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली व जवळपास दहा तासापर्यंत या मार्गावरुन येणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक कोंडी चा सामना करावा लागला. घटनास्थळी कम्युनिस्ट पार्टीचे विनोद झोडगे उपस्थित होऊन संबंधित ठेकेदाराला तात्काळ बोलावून मार्ग काढण्याचे सांगितले त्यानंतर बांधकाम अभियंत्याशी बोलून तात्काळ रस्त्याचे बांधकाम करावे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी विनोद झोडगे यांनी दिला. त्यानंतर जेसीबीच्या साह्याने ट्रक बाहेर काढल्याने या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. विनोद झोडगे यांनी बोलल्यानंतर तात्काळ खड्डे बुजवण्याला सुरुवात करणार असल्याचे मान्य करीत खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे.
प्रतिक्रिया
परिसरात खरीप हंगामाची कामे जोमात सुरू आहेत शेतकऱ्यांना बी बियाणे घेण्याकरिता गांगलवाडी ब्रह्मपुरी ला व भाजीपाला विक्रेत्यांना तसेच शैक्षणिक सत्र सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना सुद्धा व नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी दैनंदिन जावे लागते. गेल्या चार वर्षापासून या मार्गाची दैनंदिन अवस्था झाली असून खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जड वाहतूक जोमात सुरू असल्याने रस्त्याची पुन्हा दैनंदिन अवस्था होत असून तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विनोद झोडगे यांनी दिला आहे.