वाशिम : जिल्हयात 7 मार्च 2023 रोजी धुलिवंदन उत्सव मोठया प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सव कालावधीत सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीकोणातून मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) नुसार 7 मार्च 2023 रोजी धुलिवंदनाच्या दिवशी संपूर्ण दिवस संपूर्ण जिल्हयाकरीता मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांच्या नावे असलेली अनुज्ञप्ती मुंबई दारुबंदी कायद्याअंतर्गत रद्द करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी,वाशिम यांच्या आदेशात नमूद केले असल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आह .