कारंजा : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूका ऑक्टोबर मध्ये होण्याची घोषणा होताच, अनेक-गवसे-नवसे निवडणूक लढण्याच्या उद्योगाला लागल्याचे दिसून येत आहे.कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघ,आजतागायत बाहेरगावच्या नेत्यांना लाभदायी ठरल्याचा पूर्व इतिहास लक्षात घेऊन,आजुबाजूच्या जिल्ह्यातीलच नव्हे तर मुंबई राजधानीतील रहिवाशीसह, जवळपास डझनभर नेत्यांच्या नजरा कारंजा मानोरा मतदार संघाकडे वळल्या असून,या बाहेरगावच्या नेत्यांनी,कारंजा मानोरा मतदार संघाशी कोणतेही नाते गोते किंवा सोयर सुतक नसतांना,येथील मतदारांना आकर्षित करण्यासाठी,दहापाच स्थानिक लोकांना हाताशी धरून, निवासासाठी येथील लोकांची, भाड्याची घरे किरायाने घेऊन, मतदारांना आकर्षित करीत स्वतःचा प्रचार सुरु केला आहे. विशेष म्हणजे कारंजा मानोरा मतदार संघात आजपर्यत मतदाराच्या डोळ्याने केव्हाही न दिसलेल्या या नेत्यांनी समाजसेवेचा आव आणणे सुरु केले असून,त्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्ता लढविल्या जात असून विविध कार्यक्रमाचे आयोजन (जसे की रोग निदान शिबीर,रक्तदान व डोळ्याचे शिबीर,कौशल्य प्राप्त युवकाकरीता रोजगार मार्गदर्शन मेळावे वगैरे) घेऊन येथील मतदारांना आकर्षित करण्याचा फालतू उद्योग यांनी चालवीला आहे.परंतु वस्तुस्थिती अशी आहे की,येथील मतदारांना पात्र अपात्र उमेद्वाराची चांगलीच पारख आहे. सद्यस्थितीत कारंजा येथे विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची सोय,सुशिक्षित बेरोजगार,मजूर,कामगार यांचेसाठी रोजगार नसल्याने किंवा स्वयंरोजगारा करीता बँकाकडून कर्जपुरवठा होत नसल्याने,शेतकऱ्यांना ओलीताची सोय,कर्जमाफी, कर्जपुरवठा मिळत नाही.आशियातील प्रथम क्रमांकाची बाजारपेठ असूनही शेतमालावर आधारीत उद्योग कारखाने औद्योगीक वसाहत नाही.तसेच महत्वाचे म्हणजे कारंजा शहर हे पुरातन व ऐतिहासिक,सर्वधर्मिय लोकांच्या पवित्र तिर्थक्षेत्राची त्यांना आपुलकी-जिव्हाळा व प्रेमाने नांदविणारी नगरी असूनही येथे तिर्थक्षेत्र विकास आराखड्या प्रमाणे विकास होत नसल्याने, सोहळ काळविट अभयारण्य येथे असूनही येथील शेतकऱ्याच्या जमिनी शासनाने अभयारण्य, समृद्धी महामार्गासाठी बळकाऊनही येथील शेतकरी ग्रामस्थ बेरोजगारांना उद्योग लघु व्यवसाय उपलब्ध होत नसल्याने, कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघ हा खरे तर सर्वार्थाने आकांक्षित व उपेक्षित मतदार संघ ठरलेला आहे.यास्तव खरेतर आता येथील मतदाराला कोणत्याही परीस्थितीत बाहेरगावचा आमदार नकोच आहे.त्यामुळे हल्ली येथील मतदारांकडून स्थानिक आमदार मिळावा अशी मागणी होत आहे. व म्हणूनच प्रत्येक राजकिय पक्षांनी स्थानिक व्यक्तीला किंवा किमान कारंजा मतदार संघाला कर्मभूमी मानून,येथील मातीशी नाळ जुळलेल्या व्यक्तीची तरी विधानसभेची उमेद्वारी द्यावी. अशीच रास्त अपेक्षा येथील मतदार ऊराशी बाळगून आहे. यंदा भविष्यात होणारा भावी आमदार हा येथील विकास करण्यास सक्षम असलेला एखादा योजना महर्षी-सहकार नेता-विकास पुरुष व सर्वाच्या आवडीचाच असावा लागणार आहे.त्यामुळे बाहेरगावच्या नेत्यांनी एकच मंत्र लक्षात घ्याव्या की,कारंजा मानोरा मतदार संघातील जनता सावध झाली असून,यावेळी क्रांतिकारी निर्णायक मतदान करण्याच्या जीद्दीने मतदानास निघणार आहे. त्यामुळे ज्यांची स्वतःच्या मायभूमी मतदार संघात दाळ गळत नाही अशा अपयशी नेत्यांनी,कारंजा विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढवूच नये. कारण येथील जनतेला मतदार संघासाठी विकासकामे करणारा चिरपरिचित आणि विश्वासपात्र आमदार हवा आहे.असे मत, दिव्यांग जनसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार,संजय कडोळे यांनी व्यक्त केले आहे.