कारंजा (विनोद गणवीर ) : शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘शेतकरी एल्गार समिती’च्या नेतृत्वाखाली कारंजा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, तसेच प्रति एकर १०,००० रुपये प्रमाणे भावांतर अनुदान मिळावे या प्रमुख मागण्यांसह एकूण नऊ मागण्यांसाठी गेल्या चार महिन्यांपासून समितीचे आंदोलन सुरू आहे.या कालावधीत समितीचे पदाधिकारी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करत आहेत. शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत प्रत्येक टप्प्यावर आंदोलनाला पाठिंबा दिला. २१ मार्च २०२५ रोजी घेण्यात आलेल्या धरणा आंदोलनातही शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.
२२ एप्रिलचा मोर्चा ठरला ऐतिहासिक
२२ एप्रिल रोजीच्या या आक्रोश मोर्चात डॉक्टर, वकील, कृषी केंद्र चालक, दुकानदार, सरपंच संघटना, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी व शेतमजूरांनी एकत्र येत उष्णतेची तमा न बाळगता सहभाग नोंदवला. आंदोलनाच्या यशात अनेकांचे मोलाचे योगदान लाभले.
मोर्चाच्या आयोजनासाठी मा.डॉ. पंकज काटोले यांनी आर्थिक साहाय्य केले. याशिवाय संकेतभाऊ नाखले, अरविंद पाटील इंगोले, श्रीधर पाटील कानकिरड, प्रादिप वानखडे, देवेंद्रभाऊ लांडकर यांचेही महत्त्वाचे योगदान लाभले. गावोगावी फिरण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली. डॉ. रमेश चंदनशिव यांची खासगी गाडी यासाठी वापरण्यात आली असून डिझेलसाठी सर्वाधिक खर्च त्यांनीच केला.
शेतकरी एकजूट दाखवत पुढे सरसावले.
राजकुमार दिघडे, कैलासभाऊ डोंगरे, ओमप्रकाशजी तापडिया, मनोजभाऊ कानकिरड दिलीप रोकडे ,सागर दुर्गे,संकेत नाखले,अरुण चव्हाण ,माया लाहे ,शेतकरी एल्गार समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे समितीने आभार मानले.
या आंदोलनात प्रकाशभाऊ पोहरे, ज्ञायकभाऊ पाटणी, माजी नगराध्यक्ष अरविंदजी लाठीया, अब्दुल राजिक शेख, प्रदिप वानखडे, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पश्चिम विभाग अध्यक्ष राजपूत सर, महिला प्रदेशाध्यक्षा रंजनाताई मामर्डे, शेतकरी नेते विष्णुपंत भुतेकर, दामूभाऊ अण्णा इंगोले, ज्योतीताई गणेशपुरे आणि विलासराव सुरडकर विजय देशमुख ओमप्रकाश तापडिया , भारत भगत यांसारखे विविध क्षेत्रातील मान्यवरही सहभागी झाले होते.
शेतकरी एल्गार समितीचा निर्धार कायम
"राजकीय पक्ष वेगळे असले तरी आपण सर्व प्रथम शेतकरी आहोत," असा संदेश या आंदोलनातून देण्यात आला. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा ठाम निर्धार शेतकरी एल्गार समितीने व्यक्त केला आहे.
सर्व सहकाऱ्यांचे आणि सहभागींचे मन:पूर्वक आभार मानून, भविष्यातही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी एकजूट राखण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले... शेतकऱ्यांकरिता दैनिक देशोन्नती संपादक प्रकाश भाऊ पोहरे यांनी निवेदन देताना शेतकऱ्यांना आश्वासन दिले कोर्टामध्ये लढू लढाई याकरिता तुम्ही आम्हाला आमच्याकडे फॉर्म घेऊन भरून द्यावे असे सांगीतले . असे वृत्त प्रत्यक्षदर्शी पत्रकार विनोद गणवीर यांनी कळवीले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....