कारंजा : वाशिम जिल्हा टिपू सुलतान सेना कारंजाचेअध्यक्ष तथ सामाजिक कार्यकर्ते अब्दुल राजिक शेख ह्यांचे सुपूत्र अब्दुल आसीम अब्दुल राजिक ह्यांना वाशिम जिल्हा महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या वतीने सिल्वर मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
जे सी हायस्कूल येथे इयत्ता सहावीत शिकणाऱ्या अब्दुल आसीम ने सन 2021-22 ह्या वर्षी घेण्यात आलेल्या गणित संबोध स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले. अत्यंत कुशाग्र बुद्धीचा असलेला अब्दुल आसीमने ह्यापूर्वी सुद्धाअनेक स्पर्धेत भाग घेऊन विशेष प्राविण्य मिळवले आहे. त्याबद्दल महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद वाशिमचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी त्याचे अभिनंदन केले आहे .