वाशिम : वातावरणात सूर्यनारायण जणू आग ओकत असल्यागत तिव्र उष्णता वाढल्याने जिल्ह्यातील नागरिकांना एकीकडे भयंकर उकाड्याचा सामना करावा लागतो तर दुसरीकडे घराच्या परिसरात सांडपाण्याच्या नाल्या,केरकचऱ्याचे साम्राज्य असल्याने आणि घराघरात कुलर सुरू असल्याने डासाचा प्रादुर्भाव वाढला आहे.परिणामी मानवाला लहान सहान आजाराचा सामना करावा लागत आहे. सध्या तापाच्या रुग्नांची संख्या वाढलेली असून, रक्ततपासणी झाल्यानंतर डेंग्यु, मलेरियाचे रुग्न वाढले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय वाशिम यांचेकडून मिळाली आहे.तसेच या आजारावर विजय मिळविण्याकरीता, तापासारखे लहान सहान वाटणारे दुखणे अंगावर न काढता रुग्नांनी त्वरीत जवळच्या आरोग्य केन्द्रात किंवा रुग्नालयात जाऊन वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने औषधोपचार करावा.रक्त तपासणी करून तापाचे निदान करून घ्यावे.घरात आणि परिसरात स्वच्छता ठेवावी. डासांची उपज थांबवीण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न करावे. असे आवाहन महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी केले आहे.