वाशिम : दररोज सकाळी आपले नागरीक म्हणजेच शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी, चाकरमाने व इतर सर्वच नागरीक आपल्या घरामधून कामानिमित्ताने बाहेर पडले असतांना सायंकाळी घरी परत येईपर्यंत, घरची मंडळी चिंतातूर असतात. त्यामुळे नागरिकांनी कामा निमित्त स्वतःच्या बाईकने ( टू व्हिलर मोटार सायकलने ) अथवा फोरव्हिलरने प्रवास करीत असतांना जास्तितजास्त सावधगीरी बाळगून स्वतःच्याच जीविताची जास्तित जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. कारण आपल्या भागातील सर्वच रस्ते हे खड्डेयुक्त आणि गतिरोधकाचे अक्षरशः चाळण झालेले रस्ते असून, वाहनांच्या गर्दीमुळे रस्त्याने पायी जाणार्यांना सुद्धा चालता येत नाही. त्यातच रस्त्यात अचानक आडवी येणारी भटकी कुत्री किंवा जंगली श्वापदं जसे की, रानडुक्कर, रोही, निलगायी किंवा हरिणे यांच्यामुळे बरेच अपघात होत असतात. शिवाय काही उनाड मुले आपल्याच बापाचा रस्ता असल्या प्रमाणे सुसाट वेगाने वाहनं चालवितात . तर अनेकदा काही गंजाटी किंवा व्यसनाधिन दारूच्चा नशेत वाहते चालवितात . या खेरीज लांबच्या प्रवासावर असणारे ट्रक ड्रॉयव्हर यांची झोप पुरेशी झालेली नसल्याने त्यांचे सुद्धा अनेकदा वाहनांवरील नियंत्रण सुटल्याची उदाहरणं आहेत. आणि त्यामुळेच आपल्या शहरात, आपल्या जवळ्पास, समाजमाध्यमावर किंवा दररोजच्या वर्तमानपत्रामध्ये अपघाताच्या बातम्या ऐकायला मिळतात. अशा घटनांना आपले शासन सुद्धा काहीच प्रतिबंध करू शकत नाही . त्यामुळे आपण स्वतःच आपली स्वतःच्या आणि कुटुंबाच्या जीविताची जबाबदारी स्विकारून १) स्वतः आपले वाहन व्यवस्थित चालविणे. २) टू व्हिलर चालवितांना हेल्मेट वापरणे. ३) फोर व्हिलर वाहनात प्रवाशांनी बेल्ट वापरणे. ३) शक्यतो वाहन आपल्या बाजुने, कमी वेगात चालविणे इत्यादी गोष्टीची काळजी घेतली तर बऱ्याच अंशी आपण होणाऱ्या अपघातांना आळा घालून, सुखरूप आणि आरामदायी असा प्रवास करू शकतो. त्यामुळे "वाढत्या अपघाताची आता जनतेनेच दखल घेऊन, सावधगीरी बाळगणे गरजेचे" असल्याचे मत समाजसेवक संजय कडोळे यांनी व्यक्त केले आहे.