अकोला : स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालय अकोला चे सहाय्यक प्राध्यापक व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष प्रा.विशाल कोरडे यांना 24 फेब्रुवारी २०२४ रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती तर्फे 40 व्या दीक्षांत समारंभात संगीत विषयात आचार्य पदवी बहाल करण्यात आली . दीक्षांत समारंभात मानव्य विद्याशाखेच्या अधिष्ठात्रा डॉ.मोना चिमोटे यांच्या हस्ते प्रा.विशाल कोरडे यांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली . सदर समारंभास विद्यापीठाचे सर्व अधिकारी व महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री.रमेश बैस आभासी पद्धतीने हजर होते . पं.विष्णू नारायण भातखंडे कृत हिंदुस्तानी संगीत पद्धतीच्या काफी थाटातील निवडक बंदीशिंचे चिकित्सक अध्ययन ( संदर्भ - क्रमिक पुस्तक मालिका भाग १ ते ६ ) या विषयावर प्रा.कोरडे वर्ष २०१९ पासून डॉ.किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनात संशोधन कार्य करीत होते . या संशोधनामुळे प्रा.विशाल कोरडे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत पहिले अंध आचार्य पदवीधारक होण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे . प्रा.कोरडे आपल्या यशाचे श्रेय आई सौ.माधुरी कोरडे , वडील श्री.विजय कोरडे , बंधू श्रीकांत कोरडे , भगिनी सुवर्णा शेळके , मार्गदर्शक डॉ.किशोर देशमुख , प्रबंध लिखाणासाठी वाचक लेखनिक म्हणून कार्य करणारी विद्यार्थिनी अनामिका देशपांडे , मित्र सचिन शिरसाट व कुटुंबीयांना देतात . संशोधन कार्यात सहकार्य केल्याबाबत डॉ.स्नेहल शेंबेकर , डॉ.उमेश घोडेस्वार , डॉ.शिरीष कडू , डॉ.संजय पोहरे , डॉ.राजीव बोरकर , डॉ.सोपान वतारे , डॉ.हर्षवर्धन मानकर , व डॉ.मयुरी जाधव यांचेही प्रा.कोरडे आभार व्यक्त करतात . आपल्या संशोधनाचा समाज व राष्ट्राला उपयोग व्हावा याकरिता प्रा.कोरडे लवकरच या विषयावर आपली पुस्तके प्रकाशित करणार असून भारतात व विदेशात विविध ठिकाणी व्याख्याने देणार असल्याचे त्यांनी सांगितले . प्रा.कोरडे यांच्या घवघवीत यशाबद्दल अकोला जिल्हाधिकारी श्री.अजित कुंभार , समाज कल्याण अधिकारी श्री.प्रदीप सुसतकर , संगीतकार कौशल इनामदार , अभिनेत्री इरावती लागू , प्रतीक्षा देशमुख , खासदार श्री.संजय धोत्रे , शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे अध्यक्ष श्री.हर्षवर्धन देशमुख , प्राचार्य डॉ.अंबादास कुलट , श्री.अशोक चंदन , दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे अरविंद देव ,संजय तिडके ,संतोष शेळके ,विशाल भोजने ,भारती शेंडे ,विजयकुमार वनवे ,नीता वायकोळे ,पूजा गुंटीवार ,अंकुश काळमेघ ,अस्मिता मिश्रा ,स्वाती झुनझुनवाला ,संजय फोकमारे ,डॉ.अनिरुद्ध जाधव ,तेजस्विनी कोरडे ,श्रुती कोरडे व डॉ.बाबुराव नवले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत . अकोल्याच्या संगीत , सामाजिक , शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातूनही डॉ.कोरडे यांचे कौतुक केले जात आहे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....