आरमोरी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मा. रंजीतजी बनकर यांच्या नेतृत्वात अन्याय झालेल्या मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी नागपूर येथील रेशीम टसर कार्यालयावर रेशीम टसर विभागाचे वरिष्ठ सहाय्यक अधिकारी महिंद्र ढवळे साहेब यांची भेट घेऊन मजुरांची समस्या समस्या मार्गी लावण्याबाबत चर्चा केली गडचिरोली जिल्ह्या हा जंगलाचा म्हणुन ओळखला जातो व जिल्ह्यात नाहीच्या बरोबरीत उद्योग असल्याने उद्योग विरहित जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो जिल्ह्यातील बहुतांश भाग हा व्यापला आहे जास्ती प्रमाणात कंपन्या नसल्याकारणाने येथील युवकांना रोजगारासाठी बाहेर जिल्ह्यात किंव्हा राज्यात जावे लागते मात्र दुसरी कडे बघितल तर येथील मजुरांसाठी बारमाही कामे असून सुद्धा आरमोरी येथील टसर प्रयास कामगारांना केवळ नऊ ते दहा महिने काम मिळते. संगम ,वैनगंगा,प्रयास अशा तीन संघटना आरमोरी येथे कार्यरत आहे. संगम व वैनगंगा या दोन संघटनांना बारमाही कामे मिळतात मात्र प्रयास संघटनेला फक्त १० महिनेच काम दिल्या जात असल्याने त्यांना खूप मोठ्या आर्थिक समस्यांना सामोर जाव लागत आहे .प्रयास या मजूर संघटनेतील संघटित कामगारांना काम न देता.असंघटित कामगारांना काम देत आहेत .अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रंजीतजी बनकर यांनी सहाय्यक अधिकारी महिंद्र ढवळे साहेब यांच्या निदर्शनास आणून दिली दहा-पंधरा मिनिटे चर्चेत बनकर यांनी कामे असतानाही आरमोरी येथील कर्मचारी कामे नाहीत असे सांगून त्यांना कामावरून काढून टाकतात मजूर आपल्या जीवाची बाजी लावून रानात टसर रेशीम कार्यालयाचे कामे करतातअशा कामगारांना बारा महिने काम देण्यात यावे अशी मागणी रेटून धरली.महेंद्र ढवळे साहेबांनी बारमाही काम देण्याचे मान्य केले.नागपूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रंजीत बनकर ,दिवाकर गराडे,आनंद सोनकुसरे प्रशांत सोनकुसरे,प्रयास टसर कामगार संघटनेचे अध्यक्ष मुकेश कुंभारे,संजय चिचघरे,राजू मेश्राम,रुपेश मेश्राम,विजय मेश्राम,भाऊराव कांबळे.हे सर्व उपस्थित होते.