जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होत असलेल्या निवडणूक या विषयावर योग्य नियोजन करून मोठ्या प्रमाणात जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. व तसेच अनेक पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली.तसेच कारंजा शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या नवनिर्वाचित अब्दुल राजिक शेख यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सत्काराला उत्तर देतांना अब्दुल राजीक शेख यांनी 'काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.' यावेळी उपस्थित अरविंद लाठीया,जिल्हा सरचिटणीस तायडे काका, निळकंठ गजभिये, स्वपनिल तायडे,विजय देशमुख, विजय पाटील कडु, युवक काँग्रेसचे अक्षय पाटील बनसोड, निलेश कानकिरड, माजी नगर परिषद उपाध्यक्ष जुम्मा भाई पप्पू वाले अब्दुल राजिक शेख व काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते