ब्रम्हपुरी/ प्रतिनिधी :-अखिल कुणबी समाज मंडळ, ब्रम्हपुरी च्या वतिने गुणवंत विद्यार्थी व नवनिर्वाचित खासदार यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम दि.२० जुलै २०२४ शनिवारला सकाळी ११.०० वाजता स्वागत मंगल कार्यालय, ब्रम्हपुरी येथे आयोजित करण्यात आला आहे.
गुणवंत, किर्तीवंत, यशवंत हेच खरे राष्ट्राचे वैभव असते, त्यांना जपने, वाढविने, सन्मानित करून प्रतिष्ठीत करणे हाच राजधर्म असतो. या अनुषंगाने अखिल कुणबी समाज मंडळ ब्रम्हपुरीच्या वतीने "गुणवंत विद्यार्थी व नवनिर्वाचित खासदार सत्कार समारंभ" आयोजीत केलेला आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यातील प्रत्येक शाळेतुन कुणबी समाज घटकातील सन २०२४ मध्ये वर्ग १० वी मधुन प्रथम व द्वितीय तसेच ९०% व त्यावरील गुण प्राप्त विद्यार्थी तसेच कनिष्ठ महाविद्यालयातून कुणबी समाज घटकातील सन २०२४ मध्ये वर्ग १२ वी मधुन प्रथम व द्वितीय विद्यार्थी तसेच ८५% व त्यावरील गुण प्राप्त विद्यार्थी. व एम.बी.बी.एस.व आय.आय.टी. मध्ये प्रवेश घेतलेले बॅच २०२३ चे विद्यार्थी व सी.ए. फायनल झालेले विद्यार्थी. हया गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऋषीजी राऊत अध्यक्ष अखिल कुणबी समाज मंडळ ब्रम्हपुरी, उद्घाटक विरोध पक्षनेते तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार तर सत्कारमूर्ती खासदार नामदेवराव किरसान गडचिरोली, खासदार प्रतिभाताई धानोरकर चंद्रपूर, खासदार डॉ. प्रशांत पडोळे भंडारा तर प्रमूख अतिथी म्हणून आमदार बंटीभाऊ भांगडीया चिमूर विधानसभा श्रेत्र, आमदार सुधाकरराव अडबाले, रविंद्र शिंदे माजी अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर, माजी प्राचार्य डॉ. देविदासजी जगनाडे, दामोधरजी मिसार संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर, हरिचंद्र चोले जेष्ठ नागरीक संघटना, किष्णाभाऊ सहारे माजी उपाध्यक्ष जि. प. चंद्रपूर, प्रमोद चिमुरकार माजी जि. प सदस्य चंद्रपूर, प्रा. प्रकाशजी बगमारे ब्रम्हपुरी, महेद्रजी ब्राम्हणवाडे गडचिरोली,अर्जुनजी भोयर सावली, प्रा. राकेशजी तलमले ब्रम्हपुरी, प्रमोदजी तोंडरे पारडगाव, सचिनजी कठाने नागभिड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार परिषदेत समाजाचे अध्यक्ष ऋषिजी राऊत, सचिव अँड. गोविंदराव भेडारकर, प्रा.देविदास जगनाडे, हरीचंद्र चोले, सौ.अल्काताई खोकले, भाऊराव राऊत मोंटू पिलारे, महेन्द्र मातेरे, नारायण मेश्राम, सूरज तलमले, तेजस गायधने अतुल राऊत, व अखिल कुणबी समाज मंडळ ब्रम्हपुरीच्या पदाधिकारी यांनी केले आहे...
आपल्या प्रतिक्रिया द्या....