अकोला--- मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्था मर्या.अकोला या सहकारनिष्ठ शासकीय पुरस्कारप्राप्त अंकेक्षणात सतत "अ" वर्ग पतसंस्थेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल सेन्टर प्लाझा येथे नुकतीच संपन्न झाली.सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष मा.जे.टी.वाकोडे होते.
यावेळी सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,कर्मयोगी संत गाडगेबाबा मानवधर्म संस्थापक- अध्यक्ष स्व.शांतानन्द सरस्वती महाराज यांना वंदन- अभिवादन करण्यात आले. देशातील शहिद जवान, अत्याचारग्रस्त महिला बळी,आत्महत्त्याग्रस्त शेतकरी ,आपत्ती आणि अपघात बळी,सहकारातील दिवंगत नेते व संस्थेच्या दिवंगत सभासदांन व संचालकांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली.
सचिव डॉ.रणजित देशमुख यांनी विषय वाचन,माजी अध्यक्ष- संचालक संजय एम.देशमुख यांनी ईतिवृत्त तर उपाध्यक्ष दिनकर घोरड,यांनी हिशोबी पत्रांचे वाचन केले.अध्यक्षांनी अध्यक्षिय मनोगतातून सहकार्याचे आवाहन केले.ईतर संचालकांनी विविध विषयांचे वाचन केले.१० वी व १२ वी मधील गुणवत्ता प्राप्त यदुराज विजय काटे, रिध्दी अनिल भागवत व स्वरित राजनारायण गोमासे या विद्यार्थांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी खजीनदार भास्कर काळे,संचालक सुधीर वाकोडे, देवीदास घोरळ,माणिकराव सरदार,विजयराव बाहकर, प्रा.विजय काटे,इंजि.सुरेश तिडके,व संचालिका सौ. शोभाताई तेलगोटे, सौ.जयश्रीताई बोचरे व्यवस्थापक नरेन्द्र डंब ळे,विक्की क्षिरसागर व बहूसंख्य सभासद उपस्थित होते. सभेचे संचालन भास्कर काळे यांनी तर आभारप्रदर्शन माणिकराव सरदार यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....