सिंह आणि कोकराच्या लढाईत आम्हाला कोकराचे रक्षण करावे लागेल असे म्हणत न्यायव्यवस्था ही नेहमी वास्तवता व सत्याचे निरिक्षण करून दुर्बलांना न्याय देण्यात सक्रिय असते असे महत्वपूर्ण निर्णायक मत न्यायालयाने एसटी.कर्मचाऱ्यांच्या चिघळवण्यात आलेल्या संपाबाबतव्यक्त केले.
एस.टी.कर्मचाऱ्यांचा संप पगाराबाबतच्या मागण्या पूर्ण झाल्यावरही शासनात विलीनीकरण व्हावे या अशक्यप्राय मागणीसाठी दिशाहीन होत भरकटत गेला.तो करत असतांना स्वत:च्या अवाजवी मागण्यांपुढे सामाजिक कर्तव्याच्या भावनेला बाजूला ठेऊन समाजप्रतारक मतलबी राजकारण्यांच्या नादी लागण्याची नादानता घडत गेली.त्यामुळे एस.टी कामगारांकडून समाजाला वेठीस धरण्याचे एक अनुचित काम झालेले आहे.
दहशतवादी विमाने हायजॅक करतात.किंवा मतलबी मागण्या मान्य होईपर्यंत कोणाला तरी निर्दयीपणे वेठीस धरत असतात. अशा घटना आजपर्यंत पाहिलेल्या ऐकलेल्या होत्या.त्याचप्रमाणे एस.टी.कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन एक आयतीच संधी म्हणून संधीसाधू राजकारण्यांनी हायजॕक केले होते.येथील विरोधक राजकारणी नेते त्यांची लायकी नसलेल्या किंवा कधी समाजहितासाठी ज्या क्षेत्राकडे ढूंकूनही बघितलं नसेल अशा प्रांतात प्रवेश करतात. तेथे आयती नेतेगीरी करण्याचे प्रयत्न करतात हे महाराष्ट्राने पाहिले आहे.अशाप्रकारे अशा वर्गातील नेत्यांनी कामगारांना भडकविले आणि संपाला अनाष्ठ वळण लावले. कोरोना काळातही शासन नियंत्रणकार्यात अडचणी निर्माण करण्यासाठी निर्दयी वृत्तीने जनतेच्या जीवाशी खेळण्याची विरोधकांनी केलेली असंवेदनशील वाटचालही जनतेने पाहिलेली आहे.ही टवाळखोरी उघड्या डोळ्यांनी पाहून दिलेल्या वेदना सहन करीत या नालायक कारनाम्यांचीही योग्य ती दखल जनतेने घेतलेलीच आहे. ईतिहासात हाच एक असा संप ठरला की जेथे संघटनांच्या नेत्यांना नि:ष्प्रभ करून आयत्या बिळावरील नागोबा येथे फणे उभारून उभे राहिले,आणि त्यांच्या मतलबी कारनाम्यांना सिध्द करण्यासाठी गल्लेभरू पंडीतही त्यांच्या दलालीसाठी दिमतीला उभे राहिले.
प्रत्येक मनुष्याने आपले घर,परिवार आणि समाजात वावरतांना आपल्या हक्कांसोबत आपल्या कर्तव्यधर्माचेही भान ठेवले पाहिजे,हा धर्मशास्त्रातील मार्गदर्शक तत्वांनी मंतरलेला मानवता धर्म आहे.आपल्या परिश्रमाचे,कष्टाचे मुल्य आपणास निश्चितच मिळावे.तो आपला हक्क आहे,ही गोष्ट शंभर टक्के समर्थनिय आहे.परंतू आपले हक्क मागत असतांना शासनाकडून ते आपण म्हणतो त्यानुसार प्राप्त व्हावेत, हा हेका बाळगणे हे सामाजिक नुकसानाला कारणीभूत ठरू शकते, याची जाणीव कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या "माणूस"म्हणविल्या जाणाऱ्या माणसाने बाळगली पाहिजे.कारण मानवी समाजात जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जन्मत:च पारिवारीक बंधनांसोबतच समूहजीवनातील जीवनमुल्ल्यांच्या तत्वानुसार सामाजिक कर्तव्य सुध्दा ठरलेली असतात.याचे भान सद्विवूकबुध्दी जागृत ठेऊन नेहमी असले पाहिजे,ते एसटी कर्मचाऱ्यांनी ठेवले नाही.पर्यायाने आपल्यातीलच आपल्या नेत्यांना अव्हेरून सामाजप्रतारक दिशाभूल करणाऱ्या दुराचारी नेत्यांच्या आणि गल्लाभरू लोकांच्या नादी लागले.यामुळे स्वत:चे,कुटूंबांचे आर्थिक नुकसान करून सुख दु:खातील घटनांमध्ये एस.टी.बस हाच मोठा आधार मानणाऱ्या आपल्याच बांधवांच्या आनंदावर विरजण घालण्याचे कठोर काम केले.त्यांच्या संकटात त्यांना क्लेष देण्यात कारणीभूत ठरलेल्या अनेक अविस्मरणीय आठवणींचे ईतिहास आपल्या वाटचालीत त्यांनी कायम करून ठेवले.पगार वाढविल्यावर आणि काही मागण्या मान्य झाल्यावरही शक्य नसलेल्या विलीनिकरणावर प्रवाशांना वेठीस धरण्याच्या झालेल्या प्रकारामुळे एस.टी कर्मचाऱ्यांनी जनसामान्न्यांतून एवढ्या वर्षात मिळविलेल्या सहानुभतीला मात्र ता संपामुळे उतरती कळा लागली आहे.
पगार वाढवून मिळाले त्याच टप्प्यावर जर पूर्णविराम दिल्या गेला असता, तर एस .टी कामगारांप्रती समाजाच्या सद्भावना ह्या लक्षणिय प्रमाणात वाढल्या असत्या.परंतू ज्या नेत्यांना आजपर्यंत लोकांच्या समस्यांचे फक्त स्वत:च्या राजकारणासाठी भांडवल करण्याच्या, त्यांच्या जीवांशी खेळण्याच्याच विकृत सवयी लागलेल्या असतात अशा लोकांचा संग किती प्रमाणात करावा हे मनुष्याने ओळखले पाहिजे. त्यांच्या नादी लागावं किंवा नाही हा निर्णय एस.टी.कर्मचाऱ्यांना निश्चित वळणावर घेता आला नाही.त्यामुळे आंदोलन करून पगार वाढवून मिळाले, परंतू काय मिळवले आणि काय गमावले याची गोळाबेरीज जर केली तर त्याचे उत्तर मिळवण्याच्या तुलनेत समाजाकडून ईतक्या वर्षात मिळत गेलेली जनमाणसांच्या हृदयातील सहानुभूती मात्र प्रचंड प्रमाणात गमावली. ही वस्तूस्थिती एस.टी कर्मचाऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे.यामुळे नागरीकांचे प्रचंड हाल झालेत एस टी.महामंडळाचे पुढे अनेक वर्ष भरून येऊ शकणार नाही एवढे मोठे आर्थिक नुकसान झाले.तरीही न्यायव्यस्थेने मानवतावादी विचारांची कास धरून आपल्या कोकरांच्या जाणाऱ्या नोकऱ्या मात्र आपल्या जबाबदारपूर्ण न्यायिक घटनात्मक आदेशाने वाचवल्या.नाहीतर त्याही परत मिळवता आल्या नसत्या, तर या कर्मचाऱ्यांना समाजातील दुषणांसोबतच परिवारातील आरोपांनाही सामोरे जावे लागले असते. भविष्यातील ह्या सर्व अप्रिय घटनांच्या वेदनांना शितल करण्याचे महत्वपूर्ण काम न्यायालयाने केले आहे.आजपर्यंत एस.टी.महामंडळाच्या आर्थिक तोट्यांची कारणमिमांसा करण्यासाठी अनेक बुध्दीवादी समोर येत होते.त्यात एस.टी कामगारांचे नेतेही ईतरांना दुषणे देण्यात अग्रस्थानी राहत होते.परंतू आता भविष्यात जेव्हा केव्हा एस.टी.महामंडळ तोट्यात येण्याची कारणे सांगीतली जातील, त्या त्यावेळी या कारणांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांमुळे महामंडळाला पोहचविलेली हानी आणि त्यावेळी प्रवाशांचे झालेले आर्थिक नुकसान या मुद्द्याचा ठळक समावेश त्या अहवालात राहणार आहे,नव्हे ते आता एक ऐतिहासिक सत्त्यच राहणार आहे. त्या आर्थिक हानीला कारणीभूत संपकरी कर्मचारी होते असंच समाज मानणार आहे.भविष्यात या अपश्रेयाची तिव्रता कमी करून परत जनमानसांचे प्रेम कसे संपादन करावे याकरीता एस टी.कर्मचाऱ्यांना आपली भविष्यातील वाटचाल शिस्तीची,नियोजनबध्द आणि कर्तव्यबध्द ठेवावी लागणार आहे.म्हणजे परत त्यांना समाजासोबत समरस होता येईल.आता न्यायालयाने सर्वांना कामावर घ्यावे,त्यांचेवरील गून्हेही रद्द करावेत असे आदेश दिलेले आहेत.न्यायव्यवस्थेचा आदर ठेऊन, झाले गेले विसरून सर्व एस .टी कामगारांनी पूर्वपदावर येऊन आपल्या समाजबांधवांप्रतीचा दुरावा कमी करण्याचे प्रयत्न करीत राहिलं पाहिजे..! अन्यथा अशीच परिस्थीती कायम राहिली तर देशातील आर्थिक घडामोडी पाहता आणि दिशाहिन आंदोलनाला हवा देण्याची कामंच जर होत राहिली तर विलीकरण तर सोडाच ही महामंडळंच खाजगी क्षेत्राला दिल्या गेली तर कोणाला आश्चर्य वाटणार नाही...!
-:संपादक:-
संजय एम.देशमुख,मोबा.९८८१३०४५४६
आपल्या प्रतिक्रिया द्या....
=================================
Post Views: 398