वाशिम : निसर्गातील वनराईच संपुष्टात येत असल्याने उष्णतेचा अटकाव करणारी दुसरी कोणतीय यंत्रणा वनराईला पर्याय म्हणून पृथ्वीवर अस्तित्वात नाही.त्यामुळे दिवसेंदिवस उन्हाळ्याची तिव्रता प्रचंड वेगाने वाढत असल्याने तापमानाचा (पारा) उच्चांक वाढतच जातो आहे.त्यामुळे वैशाखात आगी लागण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त आहे.रस्त्यावरील इलेक्ट्रॉनिक्स व पेट्रोलची धावती वाहने पेटणे, विद्युत रोहित्र जळणे.गॅस सिलेंडर पेटणे,कारखान्यातील यंत्रसामुग्री पेट घेणे,शेतातील शेतमाल पेटण्याच्या घटना अकस्मात घडण्याची शक्यता जास्त आहे.त्यामुळे शासन-प्रशासन आणि समाजातील सुज्ञ नागरीकांनी सतर्क राहून जनतेला अग्निशमन यंत्रणा सतर्क ठेवण्याची आणि पाण्याचा भरपूर साठा भरपूर ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.तसेच दिवसाढवळ्या भर उन्हात शक्यतोवर वाहनाने प्रवास करू नये.जास्त वेगात वाहने मुळीच चालवू नये. हातातील मोबाईलचा अतिवापर करू नये.चार्जिंगची यंत्रणा इलेक्ट्रॉनिक्स गाड्या,मोबाईल जास्तवेळ पर्यंत चार्जिंग करू नये.शक्य असल्यास आपल्या घरात,वाहनात अग्निशमन यंत्रणा ठेवावी.घरात,दुकानात आणि वाहनात ज्वालाग्राही पदार्थ पेट्रोल-डिझेल-गॅस-बारूद - फटाके ठेवू नये.कोणतेही ज्वालाग्राही पदार्थ उष्णतेने तप्त होऊन आपोआपच पेट घेण्याची व त्याचा स्फोट होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आजच सावध व्हा.घराची दारे खिडक्या उघड्या ठेवाव्यात.काम झाल्यानंतर गॅस सिलेंडरला असलेले रेग्युलेटर बंद ठेवावे. जवळच्या अग्निशमन दल,ॲम्बुलन्स,हॉस्पिटल, तहसिलदार,पोलीस स्टेशनचे संपर्क क्रमांक जवळ ठेवावे. असे आवाहन सतर्कतेचा इशारा देतांना,ज्येष्ठ समाजसेवक संजय कडोळे यांनी केले आहे.