नदीपात्रात दुसऱ्या दिवशीचे शोध कार्य सुरू.* "ढगफुटी सदृश्य अतिमुसळधार पावसाने शेतकरी ग्रामस्थांना तळहातावर प्राण घेऊन करावी लागतात शेतीची कामे.
*आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांना सुलतानी व आस्मानी संकटाना एक साथ सामोरे जाण्याची आली वेळ.* मुर्तिजापूर : सध्या सर्वत्र होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांच्या पुरानी रौद्र रूप धारण केले असून, गुरुवार दि . २९ ऑगस्ट रोजी, ग्राम कंझरा येथील रहीवाशी महिला, कंझरा ते आरखेड शिवारातून शेतातील कामे आटोपून महिला रेखा रमेश मते वय ३८ आणि त्यांची मुलगी कु. साक्षी रमेश मते वय १४ ह्या मायलेकी कमळगंगा नदी पार करून घराकडे निघाल्या असतांना, पुराच्या प्रचंड लाटेने मायलेकी नदीपात्रात वाहून गेल्या असतांना सुदैवाने कु. साक्षी रमेश मते ही नदी पात्रातील झुडपाला अडकून वाचली. तर आई रेखा मते या नदीपात्रात वाहून गेल्याचे कळते. या घटनेची माहिती मिळताच आमदार हरीश पिंपळे, मुर्तिजापूर ग्रामिणचे ठाणेदार श्रीधर गुट्टे, तहसिलदार शिल्पा बोबडे, पोलीस पाटील जितेंद्र लांडे, स्थानिक सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, गावकरी घटनास्थळी दाखल झाले असून नदीपात्रात शोधमोहीम सुरू असल्याची माहिती मिळाले असल्याचे वृत्त आमचे साप्ताहिक करंजमहात्म्य प्रातिनिधी मुर्तिजापूर यांचेकडून मिळाले होते. त्यानंतर दूसरे दिवशी शुक्रवार दि. ३० ऑगस्ट रोजी, मॉ चंडिका आपत्कालिन बचाव पथकाने सकाळ पासूनच शोध मोहीम राबवली.परंतु सायंकाळपर्यंत बेपत्ता महिल्याचा शोध लागला नसल्याचे वृत्त मिळाल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळविले आहे.