कारंजा लाड : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त,कारंजाचे माजी आमदार तथा माजी मंत्री गुलाबरावजी गावंडे व माजी नगराध्यक्ष अरविंदजी लाठीया यांच्या प्रमूख उपस्थित शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व आरती मा.गुलाबरावजी गावंडे व अरविंदजी लाठीया यांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाला देवानंद देवळे ,मनोज पाटील कानकिरड, वाळके साहेब, विजय कडू , विनोद बाप्पू देशमुख ,जनार्धन पाटील बोबडे इत्यादी उपस्थित होते.
यावेळी छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने 1 क्विंटल खिचडीचे वाटप बायपास या ठिकाणी करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती प्रतिष्ठानचे संदेश देवळे, प्रतिक बोबडे, प्रफुल गवई, रूपेश देशमुख,शुभम कानकीरड अक्षय बनसोड,अभिजित कोहर , श्याम पावडे पाटील, रोहित सम्रत, धम्मपाल कुलकर्णी, गौरव करडे, ऋषभ रिठे, करण सोनोने, रोहित जाधव, रुपेश अंजणकर, आश्रय ढोक,सागर इंगळे , शुभम अलोने, वैभव ताठे, प्रशांत लुंगे , शुभम इंगले, कुनाल सोनोने,विक्की सावंत,किसना लाहे,हर्षल अंजनकर ,कासीम कुंडीवाले व इतर शिव प्रेमींनी केले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषद कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांना देण्यात आली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....