महाराष्ट्र शासनाने सगळ्याच धर्माच्या तळागाळातील गोरगरीब ज्येष्ठ नागरिकांनाही,राज्यातील तिर्थक्षेत्राचे दर्शन घेता यावे. यासाठी मोफत तिर्थदर्शन योजना आणलेली असून,आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे पैशाअभावी मनात दर्शनाची आस असतांनाही बाहेरगावी तिर्थक्षेत्र दर्शनाला जाऊ न शकणाऱ्या ज्येष्ठ लोकांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. त्याकरीता इच्छुक वारकरी नागरीकांचे वय ६० वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीसाठी ही योजना असणार आहे.या योजनेचा लाभ जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांना व्हावा. या हेतूने दि .08 ऑगस्ट 2024 रोजी शासन निर्णय जारी करून निकषांमध्ये शिथीलता आणली आहे.
सदर योजनेचा लाभ मिळण्याकरिता खालील आवश्यक कागदपत्रे हवे असणार आहेत. :
सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला 2:50 लाखांपर्यंत उत्पन्न प्रमाणपत्र किंवा अंत्योदय अन्न योजना ,प्राधान्य कुटुंब योजना ,वार्षिक उत्पन्न 2:50 रुपये लाखाच्या आत असलेले मात्र प्राधान्य कुटुंब नसलेले शिधापत्रिकाधारक,
जर पती-पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकाची लॉटरी निवड झाली असेल आणि दुसऱ्या जोडीदाराची लॉटरी निवड झाली नसेल तर, जिल्हास्तरीय समिती त्यांना एकमेकाच्या सोबत तिर्थक्षेत्राच्या यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतात.
सदर योजनेसाठी पोर्टल किंवा मोबाईल ॲप द्वारे ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे.परंतु दिनांक 31 ऑक्टोंबर 2024 पूर्वी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.
75 वर्षावरील अर्जदाराच्या जीवनसाथी किंवा सहाय्यक यांचे वय 60 वर्षापेक्षा कमी असेल तरी जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एक अर्जदारासोबत प्रवास करू शकतात.परंतु सहायकाचे किमान वय वर्ष 21 ते कमाल वय 50 वर्षे असावे. सहाय्याने शारीरिक दृष्ट्या निरोगी आणि प्रवासासाठी तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
अधिक माहिती करिता सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे संपर्क साधावा.असे आवाहन समाज कल्याण आयुक्तांनी केले आहे. अशी माहिती दिव्यांग समाजसेवक संजय कडोळे यांनी कळवीली आहे.