कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) कारंजा येथील विविध सामाजिक कार्याकरीता व्रतस्थ असलेले,अपघातग्रस्तांच्या नुसत्या माहिती वरून रात्री बेरात्री धावून जाणारे,रक्तदान चळवळ, वृक्षारोपण यासारखे राष्ट्रीय कार्यक्रम यशस्वीपणे राबविणार युवा समाजसेवक रवी घाटे यांनी स्वतःच्या कल्पनेतून त्यांच्या बाईक (टू व्हिलर) वाहनाचे "श्री विठ्ठल रथात" रूपांतर केले होते. आणि या श्री विठ्ठल रथातून स्वतःच्या वाहनाने त्यांनी आषाढी वारी पूर्ण केली असे वृत्त त्यांनी, महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळवीले आहे.आपल्या या वारीमध्ये,मार्गात त्यांनी समाजसेवी,राष्ट्रीय कार्यक्रमाची जनजागृती केली.तसेच जेथे जेथे त्यांचा मुक्काम व्हायचा तेथे तेथे त्यांनी वारकर्याशी संवाद साधत, त्यांचे हातपाय दाबणे,मालिश करणे व त्यांना राष्ट्रिय कार्यक्रमाविषयी जागृत करण्याचे बहुमोल कार्य केले असी माहिती कारंजा येथील वारकरी मंडळाचे संजय कडोळे यांनी कळविले आहे .