सर्वत्र नवरात्रोत्सवाची लगबग सुरू आहे . आणि अश्यातच गडचिरोली तालुक्यातील पूलखल येथे २२ सप्टेंबरची सकाळच्या सुमारास मोठी धक्कादायक घटना घडली. तीन वर्षापूर्वी मुलाच्या खुनात सहभागी असलेल्या व वर्षभरापूर्वी जामिनावर कारागृहातून सुटलेल्या महिलेवर वडिलांनी सूड उगवत कुन्हाडीचे घात घालून संपविले. 'खून का बदला खून'च्या या थरारपटाने जिल्हा पूर्णतः हादरला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , ललिता देवराव गेडेकर (५५, रा. पूलखल ता. गडचिरोली) असे मृतक महिलेचे नाव आहे, तर पुलखल येथील रामकृष्ण मेश्राम (६०) असे संशयित आरोपीचे नाव आहे. सन २०२२ मध्ये रामकृष्ण यांचा मुलगा कैलास मेश्राम (वय २८) याला ललिता आणि तिचा मुलगा नरेश देवराव गेडेकर (वय २१) या दोघांनी फावड्याने वार करून ठार केले होते. ललिता वर्षभरापूर्वी जामिनावर कारागृहातून बाहेर आली होती. मुलाच्या खुनात सहभागी असल्याने वडील रामकृष्ण यांच्या मनात ललिताबद्दल जुना राग होता. यामुळे रामकृष्ण याने शेतामध्ये निंदनाचे काम करत असलेल्या ललिताबाईवर् कुऱ्हाडीने वार करून संपविले .आणि तिथून पसार झाला .
ललिताबाई ही शेतामध्ये एकटीच असल्याने आरोपीने
आपला डाव साधला
सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली
लगेच गडचिरोली पोलिस घटनास्थळावर दाखल होवून घटनेच्या पंचनामा केला आरोपीला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.