वाशिम : जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळ आणि विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाच्या वतीने,दिंडीप्रमुख महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त समाजप्रबोधनकार हभप संजय कडोळे हे आपल्या सहकारी वारकऱ्यासह सन 2005 पासून दरवर्षी श्रीक्षेत्र पंढरपूर तुळजापूरची दरवर्षी वारी करीत असतात.आधी ते पायदळ वारी करायचे.परंतु सन 2015 मध्ये झालेल्या अपघातापासून आता सन 2015 पासून दिव्यांग सहकाऱ्यासह रेल्वेने प्रवास करून वारी करतात.आपल्या वारीमध्ये ते महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंधश्रद्धा,व्यसनमुक्ती व राष्ट्रिय कार्यक्रमाचा प्रचार प्रसार आणि वृक्ष बिजावरोपण देखील करतात.या वारीमध्ये त्यांनी " हे पांडूरगा यंदा चांगला पाऊस होऊन शेतकरी राजाला सुख समृद्धी लाभू दे !" असे साकडे महाराष्ट्राचे आद्यदैवत श्री विठुरखुमाईला घातले.नुकतीच त्यांनी आपली वारी पूर्ण केलेली असून त्यांनी वारीबद्दलच्या आपल्या अनुभवात सांगितले की, "विदर्भाचे शेतकरी दरवर्षी आपल्या शेतातील पेरण्या आटोपून श्रीक्षेत्र पंढरपूरला जात असतात.मात्र ह्या काळात मी पंढरपूरला केव्हाच पेरण्या झालेल्या पाहिल्या नव्हत्या. साधारणपणे आषाढी एकादशी - पोर्णीमेनंतरच तेथे पेरण्या होतात. मात्र यावर्षी श्रीक्षेत्र पंढरपूर भागात मान्सून पूर्व रोहिणी नक्षत्राचा आणि मृग नक्षत्राचा चांगला पाऊस होऊन,शेतातील पेरण्या आटोपून रोपे चांगलीच वर आलेली दिसल्याचे आढळून आले.तसेच श्रीक्षेत्र पंढरपूर मुक्कामाहून श्रीक्षेत्र तुळजापूर दर्शनास जाऊन परत श्रीक्षेत्र पंढरपूर येथे येतांना आम्हाला मुसळधार पावसाचा सामनाही करावा लागला होता.त्यामुळे यावर्षी महाराष्ट्रावर पांडूरंगाचा वरदहस्त किंवा कृपाशिर्वाद असून त्यामुळे चांगला पाऊस होऊन शेतीचा हंगाम चांगला होणार असल्याने आगामी चालू आर्थिक वर्ष शेतकऱ्यांना सुख समृद्धी आणि भरभराटीचे जाणार आहे." असे वृत्त त्यांनी कळवीले.