ब्रम्हपुरी शहरामध्ये असलेले कोटतलाय किनारी झूडपात तारापत्त्यावर पैशाची भाजी लावून अवैधरीत्या जुगार खेळणान्या लोकांवर ब्रम्हपूरी पोलीसांनी छापा टाकला. त्यांचेकडून नगदी कॅश मोबाईल व मोटारसायकल ई. वस्तू जप्त करण्यात येउन त्यांचेविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
दि.20/08/22 रोजी दुपारी ब्रम्हपूरी पोलीसांना गोपनीय माहीती मिळाली की ब्रम्हपूरी शहरामध्ये असलेले कोटललावाचे किनारी भागात असलेल्या झूडपाचे आडोसा घेउन काही लोक तापल्यावर पैशाची बाजी लावून अवैधरीत्या मोठा जुगार खेळत आहेत. त्यावरून ब्रम्हपुरी पोलीसांनी आपली ओळख लपवून सदर ठिकाणी खाजगी वाहनाने जाउन रेड टाकली. पोलीस पाहून जुगार खेळणारे पळण्याच्या प्रयत्न करू लागताच 11 जणांना पकडण्यात आले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यातून एकत्रितरीत्या 25320 रु. नगदी कॅश 5 मोटारसायकल 230000 रू. 9 मोबाईल एकूण किंमत 2000 रू 50 रू. ताशपत्ते असा एकूण 317320 रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार खेळणाऱ्याना पोस्टेला आणून त्यांचेवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदयाअन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कार्यवाही श्री. मिलींद शिंदे, उपविभागीय पोलीय अधिकारी, ब्रम्हपूरी व पोलीस स्टेशन ब्रम्हपूरीचे ठाणेदार रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी प्रशांत खबरें पोउपनी स्वप्नील गेडाम, नापी भूकेश गजबे, योगेश शिवनकर, पोशी / नरेश कोडापे, विजय मैद, संदेश देवगडे, अजय कटाईत यानी केली.
तसेच पोळा सणाच्या दिवशी पोस्टे हद्दीतील मौजा कूर्झा, चिखलगाव, अहेर नवरगाव गावात अवैध दारूबाबत मोहीम राबवून अवैध दारू विक्रेत्यावर कार्यवाही करून गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कार्यवाही सफी / विलास डाग, पोहवा / अरून पीसे व नापो / नरेश कोडापे यांनी केली. आगामी गणपती व इतर सणाच्या निमित्ताने पोलीस स्टेशन ब्रम्हपूरी तर्फे अशा प्रकारच्या विविध गुन्हे करणाऱ्यावर धाडी टाकून कडक कार्यवाही करण्यात येईल.