*
**
कारंजा लाड -- राज्यातील जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील ज्ञानेश्वर गाढे या इसमाने जैन संत परम पूज्य आचार्य श्री विद्यासागरजी महाराजांच्या फोटोचा वापर करून त्यांच्या चेहर्यावर म़ोपिंग करून भाजप नेते मंत्री नितेश राणे यांचा चेहरा लावून फेसबुकवर पोस्ट केला .जैन साधुसंतांच्या या अवमानकारक कृत्याबद्दल कारंजा लाड सकल जैन समाजाने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून गैरकृत्य केलेल्या संबंधित आरोपी वर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. याबाबत पोलीस स्टेशन ला ही संबंधित व्यक्ति विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, जगात सर्वत्र शांतताप्रिय, अहिंसक व शांतता व सुव्यवस्था राखण्यास महत्वाची भुमिका बजावणाऱ्या जैन समाजावर सध्या संकटाचे ढग दाटून येत आहे, कधी मंदिराची तोडफोड तर कधी मुर्त्यांची विडंबना , कुठे जैन मंदिरावर अतिक्रमण आणि आता तर साधुसंतांना ही नाही सोडले, देशात व राज्यात जैन साधुसंतांवरील हल्ले वाढत आहे, साधुसंतांना मारहाण केल्या जात आहे तर बरेच साधुसंत रस्ते अपघातात बळी पडत आहे हे कमी पडत आहे म्हणून की काय साधुसंतांच्या फोटोलाही विकृत स्वरूप देण्याचा प्रकार चालवला आहे, हा जैन धर्म, संस्कृती व गुरुंचा खुप मोठा अपमान असुन आरोपी ज्ञानेश्वर गाढे याच्या या निंदनीय कृत्यामुळे संपूर्ण जैन समाजाच्या भावना दुखावल्या आहे. जैन समाज शांत व शिस्त प्रिय असल्यानेच जैन समाजाला सतत त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भावना समाजाची होत आहे पण जैन समाजाने नेहमीच संयमाची भुमिका साकारत शांततेच्या मार्गाने व लोकशाही ला प्रेरक अशीच आंदोलने केली आहे .
निवेदन सादर करते वेळेस ॲड. संदेश जिंतुरकर, शिरीष चवरे, अतुल नांदगावकर, राजेंद्र खंडारे , भरत भोरे, पपीश कहाते, अंकित नांदगावकर, प्रज्वल गुलालकरी, विनम्र चवरे, नितीन बुरसे , विजय जिंतुरकर, शिशिर कस्तुरीवाले, नयन दर्यापुरकर, आलोक चवरे, संदीप मेहेत्रे, राजुभाऊ फुरसुले, स्वप्नील गुलालकरी, आशुतोष जोहरापुरकर, पंकज जैन, सुदेश गुळकरी, नितीन चढार, नितीश कस्तुरीवाले, नितीन काळे आदी समाज बांधव उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....