कारंजा : मराठा महासंघ प्रणित श्री संत नामदेव तुकाराम परिषद,स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना आणि जय भवाणी जय मल्हार वारकरी मंडळ कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने, कारंजा येथे लवकरच भव्य व दिव्य असा "जिल्हास्तरीय वारकरी मेळावा" घेण्यात येणार आहे.
सदरहु मेळाव्याचे स्वागताध्यक्ष वाशिम जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती जयकिसनजी राठोड हे राहणार असून, मेळाव्याचे आयोजक, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यीक, पत्रकार, लोककलावंत हभप संजय महाराज कडोळे हे असून सदर्हु मेळाव्याचे उद्घाटक कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार राजेंद्रजी पाटणी, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त, मराठा सेवा संघ प्रणित श्री संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद वाशिमचे जिल्हाध्यक्ष हभप श्रीकृष्ण महाराज राऊत, प्रमुख अतिथी अमरावती विधानपरिषद शिक्षक मतदार संघाचे आमदार किरणरावजी सरनाईक, रिसोड मालेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार अमितजी झनक, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष हे असणार आहेत.

सदर्हु कार्यक्रमाला संपूर्ण वाशिम जिल्ह्यातून फार मोठा वारकरी समुदाय एकत्र जमणार असून, यावेळी प्रमुख पाहुण्यांचे हस्ते वारकरी मंडळीना, शाल, श्रीफळ, हार, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन राज्यस्तरीय संत नामदेव तुकाराम वारकरी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे . तसेच श्रीक्षेत्र वृंदावन येथील दिव्यांग महिला किर्तनकार हभप चित्राताई महाराज वाकोडे यांचे सुमधूर वाणीतून किर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून लवकरच या कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता स्वागत समिती, पुरस्कार समिती, भोजन समिती, दिंडी समितीचे गठण आणि इतर कार्यक्रमाच्या आयोजना करीता बैठक घेण्यात येणार असल्याचे आयोजक हभप संजय महाराज कडोळे यांनी कळविले असून

उद्घाटक म्हणून कार्यक्रमाचे निमंत्रण आ. राजेंद्रजी पाटणी यांना देण्याकरीता रविवार दि. २० नोहेंबर रोजी जि . प . माजी सभापती जयकिसनजी राठोड यांचे नेतृत्वात आ . राजेंद्रजी पाटणी यांची आयोजन समितीचे हभप संजय महाराज कडोळे तथा उमेश अनासाने यांनी, आमदार कार्यालयात जाऊन भेट घेतली . व त्यांना सादर निमंत्रण देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला आहे. उदघाटनाला आमदार राजेंद्रजी पाटणी यांनी येण्याचे आश्वासन दिल्यामुळे वारकरी मंडळींमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....