कारंजा : दिनांक १०/०७/२०२४ ला कृष्णाप्रभा विद्यालय खेर्डा कारंजा येथे खेर्डा गावातील जि. प.शाळेत शिकलेले व सध्या विविध पदावर कार्य करून सेवनिवृत्ती झालेले पदाधिकारी यांच्या तर्फे वर्ग १० वी मध्ये मार्च २०२४ च्या अमरावती बोर्ड परीक्षेत शाळेतून सर्वात जास्त ८८% गुण मिळवल्याबद्दल आदित्य संदीप अंभोरे या विद्यार्थ्याला ५००० रु. बक्षीस देऊन त्याचा गौरव करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला खेर्डा येथील माजी विदयार्थी विठ्ठलराव तुमदाम अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शावराव सिरसाट, विश्वानाथ इडपाते , अन्नासाहेब जिरापुरे, श्रीकांत माने गटशिक्षणाधिकारी कारंजा, अण्णासाहेब मुंदे केंद्रप्रमुख येवता, जि प. शाळेच्या मुख्याध्यापिका छाया माटोडे, रामहरी पंडीत, गजानन झंझाड, कृष्णाप्रभा विद्यालया खेर्डा येथील मुख्याद्यापक पुरुषोत्तम म्हातारमारे, शिक्षक नासिक जाधव, देविदास मनवर आदी मान्यवर उपस्थित होते.
वर्ग १ ते ७ पर्यंत जि. प. शाळेतील व वर्ग ८ ते १० पर्यंतच्या कृष्णाप्रभा विद्यालय खेर्डा येथील सर्व विद्यार्थ्यांना नोट बुक देऊन त्यांना शिक्षणा विषयी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.