ब्रम्हपुरी: सोमवार रात्रौ शहरातील देलणवाडी वार्डातील एका बार जवळ दोन लोकांच्या झालेल्या आपसी वादात एकाने रागाच्या भरात दुसऱ्या इसमावर केलेल्या प्राणघातक चाकू हल्ल्यात सदर इसम गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी घटनाक्रम घडलेल्या बार जवळीलच एका नामांकित हॉस्पिटल मध्ये उपचार घेतं आहे तर शहरात घडलेल्या चाकूहल्ल्याच्या घटनेने नागरिक अवाक झाले आहेत.
अवैध व्यावसायिकांसाठी नंदनवन शहर म्हणून ब्रम्हपुरी शहराची वाढणारी ख्याती, रेती, मुरूम, सट्टा, जुगार इत्यादी अवैध माफिया मुळे शहरात एक दिवस गँगवार होणार असे भाकीत बरेचदा सुज्ञ नागरिक व्यक्त करीत होते तर वृत्तपत्रामधून सुद्धा तशे वृत्त प्रकाशित झाले आहेत. मात्र स्थानिक प्रशासनाने घेतलेली बघ्याची भूमिका बघता कांड होणारच एवढ निश्चित असल्याचे नागरिकांच्या चर्चेतून बाहेर येत होते.
जेवणाच्या दरम्यान झालेल्या या वादात गैरसमजातून वाद झाल्याचे मानत दोघांतील वाद तूर्तास मिटला मात्र मनात राग ठेऊन पूर्ण तयारीनीशी हल्लेखोराने काही वेळातच चाकू आणत हल्ला केल्याचे नागरिकांच्या चर्चेतून सामोरं येत आहे. सदर प्रकरणाच्या झालेल्या तक्रारीची माहिती अद्याप नाही मात्र सदर हल्ला अवैध व्यवसायिकांच्या उन्मादाची प्रचिती असल्याचे नागरिकांत चर्चा आहेत