दि को-ऑपरेटिव्ह चंद्रपूर जिल्हा मार्केटिंग विभाग अंतर्गत शेतकऱ्यांसाठी शासनानी ठरवून दिलेल्या हमी भावानुसार शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या आधारभूत उन्हाळी धान खरेदी केंद्र किन्ही- रनमोचन- खरकाडा सहकारी संस्थेच्या माध्यमातून रणमोचन येथील नाबार्डच्या कृषी विभागामार्फत उपलब्ध असलेल्या गोदाम मध्ये दिनांक ५ जून२०२३ रोज सोमवारला सकाळी १० वाजता पासून आधारभूत धान खरेदी केंद्राला सुरुवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी आधारभूत धान खरेदी केंद्राची ऑनलाइन केली असेल अशा शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जाणार आहे.
आधारभूत धान खरेदी केंद्राचे शुभारंभ दिनांक ५ जून२०२३ रोज सोमवारला सकाळी १० वाजता किन्ही सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुरेश दर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सेवा सहकारी संस्थेचे गट सचिव गजपुरे साहेब, संस्थेचे सदस्य बिशेन प्रधान, विजय दोनाडकर, पत्रकार विनोद दोनाडकर, सुदाम भागडकर, पुरुषोत्तम दोनाडकर, केशव राऊत,विलास दोनाडकर, पुरुषोत्तम प्रधान, वेदांत दर्वे, प्रदीप बुराडे, यांच्यासह शेतकरी वर्ग उपस्थित होते