ब्रम्हपुरी :- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव व सर्वहारा वर्गाचे नेते कामगार चळवळीचा बुलंद आवाज कॉ. सिताराम येचुरी यांचे नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात निधन झाले.
त्यांना अखेरची श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी ब्रम्हपुरी येथील विविध पक्षाचे सामाजिक संघटनेच्या वतीने १३ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता ब्रम्हपुरी विश्राम गृहाच्या हॉल मध्ये श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी श्रध्दांजली कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक संघटनेचे हरिश्चंद्र चोले यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आले.
सर्वप्रथम कॉ. सिताराम येचुरी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर कॉ. विनोद झोडगे कम्युनिस्ट पक्ष, प्रशांत डांगे रिपब्लिकन पक्ष खोरीपा, ऍड.गोविंदराव भेंडारकर काँग्रेस पक्ष ,अविनाश राऊत राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट,आदींनी आपली शोक संवेदना व्यक्त केल्या.दलीत शोषित वंचित संघटित असंघटित तसेच कामगाराचा हक्कासाठी लढणारा योद्धा आपल्यातून निघून गेल्याने चळवळीची मोठी हानी झाल्याचे विचार मांडले.
दोन मिनिट स्तब्ध राहून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमास अखिल कुणबी समाज संघटना चे कोडापे सर,रिपब्लिकन पक्ष खो री पा तालुका अध्यक्ष नरेश रामटेके,ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समिती चे दीपक नवघडे ,कुणबी समाज संघर्ष समिती चे
रुपेश मैंद, इंजिनियर संदीप तुपट आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रास्ताविक प्रशांत डांगे यांनी केले.