अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाचे दिव्यांग कलाकार आपल्या कलाप्रदर्शनाने संपूर्ण भारतभर आपली छाप पाडत आहेत .
दिनांक २८ मे २०२३ रोजी अकोल्यात झालेल्या स्वर काव्य महोत्सवात संस्थेच्या दिव्यांग चित्रकारांनी आपले कला प्रदर्शन करून अभिनेत्री इरावती लागू व संगीतकार कौशल इनामदार यांना आश्चर्याचा धक्का दिला. संगीतकार कौशल इनामदार यांची संगीत मैफिल सुरू असताना दिव्यांग चित्रकार शेख जाकीर शेख रहीम यांनी संगीतकार कौशल इनामदार यांची गान मुद्रा हुबेहूब ड्रॉइंग शीट वर साकारली, त्याचबरोबर दिव्यांग चित्रकार श्रद्धा जोध द्वारा अभिनेत्री इरावती लागू यांची अभिनय मुद्रा चित्रित केली.
सभागृहाच्या प्रवेशद्वारा जवळ श्रद्धा जोध ने काढलेली रांगोळी सुद्धा कला रसिकांची दाद मिळवून गेली.दोन्ही दिव्यांग चित्रकारांनी आपली कलाकृती संगीतकार इनामदार व अभिनेत्री लागू यांना सप्रेम भेट दिली.आपल्या संगीत मैफिलीत प्रथमच अलौकिक आनंद देणारा हा चित्र अविष्कार असल्याचे संगीतकार इनामदार यांनी सांगितले तर आपला नाट्य अभिनय चित्राकृतीत पाहून अभिनेत्री इरावती लागू यांना मनस्वी आनंद झाला. दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने प्रा.विशाल कोरडे यांनी भारतात व जागतिक स्तरावर दिव्यांग कलाकरांना दिलेल्या व्यासपीठाचे त्यांनी कौतुक केले. यापूर्वीही दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या दिव्यांग चित्रकारांनी अकोला महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर पर्यावरण संरक्षणाचे संदेश देत भिंती चित्राच्या माध्यमाने रेखाटले आहेत . संस्थेच्या या दिव्यांग चित्रकारांना सर्व सामाजिक संस्थांनी कलाविष्कार करण्याची संधी देऊन त्यांना रोजगार निर्मितीसाठी सहयोग करावे . असे आव्हान आयोजन समितीचे मुख्याध्यापक अरुण राऊत , अनामिका देशपांडे, अथर्व मेरेकर , डॉ.सत्यजित कूचर , सचिन शिरसाट , प्रवीण पाटील , नीता मेहता व सुकसेन शिरसाट यांनी केले आहे .