अकोला:- स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने संस्थापक अध्यक्ष डॉ. विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक उपक्रम संपूर्ण भारतभर राबवले जात आहेत. जानेवारी महिन्यातील संक्रांति विषयक विविध उत्पादने दिव्यांग बांधवांनी तयार केली असून दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने ती संपूर्ण भारतभर विकली जात आहेत. या विक्रीतून मिळणारा निधी दिव्यांगांच्या शिक्षण, रोजगार व आरोग्यासाठी उपयोगात आणला जात आहे. विशेष म्हणजे अकोल्यातील विविध ठिकाणी स्टॉल लावून दिव्यांग बांधव स्वयं रोजगार प्राप्त करीत आहेत.दिव्यांग बांधवांनी संक्रांत निमित्त तिळगुळ कॅन्डी, तिळगुळ लाडू, शेंगदाणे लाडू इतर खाद्य पदार्थ,पूजन साहित्यात तुपाच्या फुलवाती, धूप, अगरबत्ती,चंदनटिळा,समई वात, लोकरीचे बुके , किचन व शोभिवंत वस्तूंची निर्मिती केली आहे.सदर सामाजिक उपक्रमात दिव्यांगांना रोजगार देण्यासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे एक हात सहकार्याचा दिला जात आहे.ज्या दिव्यांगांना प्रशिक्षण घेऊन रोजगार हवा आहे त्यांनी संस्थेच्या ९४२३६५००९० या हेल्पलाईन क्रमांकावर नोंदणी करावी असे* आवाहन संस्थेचे कोषाध्यक्ष विजय कोरडे यांनी केले आहे.या सामाजिक उपक्रमात दिव्यांगांना प्रशिक्षण देण्यासाठी अनामिका देशपांडे, निता वायकोळे ,नेहा पलन, अस्मिता मिश्रा,मेघा देशपांडे,संगीता घारपळकर, पुजा गुंटिवार, अदिती वाडे यांचे प्रशिक्षक म्हणून सहकार्य लाभत आहे.