कारंजा..महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी कामरगाव येथे भारतीय लोकशाही संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रामराव इंगळे
यांच्या नेतृत्वात कामरगाव येथील आठवडी बाजारात धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात रामदास भोने,विनोदभाऊ पुंडलिकराव किर्दक, सुनिल शामरावजी थोरात,ज्ञानेश्वर नरुजी वानखडे, धम्मदिप महादेवराव वानखडे, प्रतिक दुर्योधन थोरात,मोहम्मद मुझीर राजा, नंदकिशोर विठ्ठलराव जवंजाळ, अजाबराव डोंगरदिवे, सुमेध बाळु वानखडे,धम्मपाल इंगळे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. लाखो बौद्ध अनुयायांचे श्रद्धास्थान असलेले बिहार मधील बुद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.
बौध्द अनुयायांचे श्रध्देचे स्थान असलेले बिहार मधील बुद्धगया महाबोधी बुद्ध विहाराची सूत्र बी टी अँक्ट 1949 रदद करून बौध्दांच्या ताब्यात देण्यात यावी. या ठिकाणी इतर धार्मिक लोकांचे बेकायदेशिर रित्या वर्चस्व प्रस्तापित असल्यामुळे बौध्द धार्मिक संस्कृतीचा -हास होत आहे. त्याच प्रमाणे प्रशासकीय अडचनीमुळे बौध्द बांधव त्यांच्या धार्मिक अधिकारा पासुन वंचीत होत असल्याचे दिसुन येत आहे. बौध्द अनुयायी महाबोधी बुध्द विहारची संपुर्ण मुक्ती आणि बौद्ध भिक्षू अनुयायांच्या ताब्यात बुध्द विहाराची सुत्रे देण्यासाठी देशामध्ये संघर्षमय वातावरण निर्माण झाले आहे. बुध्दगया येथील महाबोधी महाविहार हे संपूर्ण जगात बौध्दांकरीता पवित्र स्थान आहे. सध्यस्थीतीत बौध्द भिक्षु बांधव संविधानिक रित्या उपोषण आंदोलण करीत असून तेथील आंदोलन उपोषण बंद करण्याचा प्रयत्न बिहार प्रशासनाचा वतीने पोलीसांच्या माध्यमातून केला असून बौध्द भिक्षूना रात्री 1 वाजता अज्ञान स्थळी नेवून आंदोलन उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला याचा आम्ही निषेध करतो. ही व्यवस्था धार्मीक स्वातंत्र्याचे मोठ्या प्रमाणात उलंघण करीत आहे.
तरी बिहार सरकार तसेच देशाच्या सन्माननिय महामहिम राष्ट्रपती यांनी या विषयावर विषेश लक्ष देवून आंदोलन कर्त्यांच्या मागण्या पुर्ण करून, लोकशाहीचा आदर आणि देशाचा सन्मान वाढवावा. अशा आशयाचे निवेदन राष्ट्रपतींना यावेळी पाठविण्यात आले.टैपल अँक्ट 1949 रदद करून महाबोधी बुध्द विहार बौध्द बांधवाच्या, भिक्षु संघाच्या नियंत्रणात सदर विहाराची देखभाल देण्यात यावी. जेणे करून बौध्द संप्रदाय आणि बौध्द संस्कृती सुरक्षित व अबाधित राहील.इ.स. सहाव्या शतकामध्ये तथागत भगवान गौतम बुध्द यांचा जन्म बुध्दगया येथे झाला आहे. त्यामुळे बौध्द अनुयायांचे एकमात्र श्रध्देचे स्थान सदर बुध्दगया येथील महाबोधी बुध्द विहार आहे. देशातील बौध्द अनुयायी सदर ठिकाणी जाऊन आपल्या धार्मिक आस्थेला वाव देतात. भारतीय संविधानाने सुध्दा भाग 3 मध्ये कलम 25 ते 28 धार्मिक स्वातंत्राचे अधिकार दिले आहे. आणि म्हणुन बौध्द अनुयायांना त्यांचे पवित्र असलेल्या श्रध्देचे स्थळापासून वंचित ठेणारी कलम 1949 अधिनियम खारीज करून सदर ठिकाणी बौध्द भिक्षु आणि बौध्द अनुयायी यांच्या ताब्यात महाबोधी बुध्द विहार देण्यात यावे.या करीता धरणे आंदोलन करण्यात आले.या धरणे आंदोलनात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.