इंगलंड वि. लंका टि-20 वर्ल्ड कप लाईव्ह क्रिकेट मॅच वर सट्टा लावणाऱ्या 3 आरोपींन वर चंद्रपुर स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाची कारवाई करुन आरोपींना अटक केली असून शनिवार चा रात्री मुल शहरात ही कारवाई करण्यात आली शहरातील पोलिस स्टेशन मुल हद्दीतील वार्ड नं.14 येथे एका घरात इंगलंड वि. लंका टि-20 वर्ल्ड कप लाईव्ह मॅच वर सट्टा लावल्या जात असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरिक्षक बाळासाहेब खाडे यांना मिळाली. स्थनिक गुन्हे शाखेचा पथकाला घेऊन त्यांनी घरात धाड टाकली. असता घरात प्रवेश करताच 2 इसम हे क्रिकेट वर सट्टा लावत असल्याचे आढळून आले.पोलिसांनी 04 मोबाईल हँडसेट, 01 एल. इ. डी. टिव्हि, सेट अप बॉक्स, कॅलक्युलेटर, असा एकुण किंमत 48,405/-रु.चा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी नाना तोडेवार व अझरुद्दीन काझी या 2 आरोपीस अटक करण्यात आली असून या प्रकरणी सट्टा बुक्कि हा विजय केशवाणी असून सद्या तो फरार असून पुढील तपास पोलीस करत आहेत. सदर ची कारवाई पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी यांचा आदेशाने चंद्रपुर स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात पोउपनि अतुल कावळे पोहवा नितीन साळवे, पोहवा प्रकाश बलकी, नापोशी सुभाष गोहोकार, पोशी मिलींद जांभुळे, पोशी सतिश बगमारे यांनी केली..