कारंजा : के. एन. कॉलेज - भिमनगर - श्रीमती एम.आर. नागवाणी हायस्कूल अॅन्ड ज्यु.कॉलेज- मातोश्री रमाबाई आंबेडकर कॉलनी - गौतमनगर - शांतीनगर - लक्ष्मीनगर ते नागपूर - छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) हायवेपर्यंत रस्त्याचे बांधकाम प्रस्तावित करणेबाबत मागील १६/०३/२०२० व १३/११/२०२० ला मुख्याधिकारी नगरपरिषद कारंजा व लोकप्रतिनिधीस निवेदन सादर केले होते. निवेदन दिल्यानंतर नगर परिषद कारंजा यांचे नगर अभियंता सुधाकर देशमुख यांनी लोकप्रतिनिधीसह सदर रस्त्याची स्थळदर्शक पाहणी केली व सदर रस्त्याचे अंदाजपत्रक सादर करुन मंजूरी करणेस्तव पाठपुरावा करण्यात येईल व रस्त्याचे काम सुरु करण्यात येईल असे सांगितले होते. परंतू अद्यापपर्यंत सदर रस्त्याच्या कामात मंजुरी न मिळाल्यामुळे दि.२५/१२/२०२३ रोजी भूमिपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त कारंजा मानोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेंद्र पाटणी हे बंजारा कॉलनी कारंजा लाड येथे काँक्रीट रस्त्याच्या भूमिपूजनानिमित्त आले असता त्यांची पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख तथा कारंजा तालुका अध्यक्ष विलास राऊत यांनी त्यांची भेट घेवून सदर रस्त्याचे काम प्रस्तावित करणेबाबतचे निवेदन देवून त्यांच्यासोबत विविध जनहितार्थ विकास कामाच्या बाबत चर्चा केली. .
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, के. एन. कॉलेज - भिमनगर - श्रीमती एम.आर. नागवाणी हायस्कूल अॅन्ड ज्यु.कॉलेज- मातोश्री रमाबाई आंबेडकर कॉलनी - गौतमनगर - शांतीनगर - लक्ष्मीनगर ते नागपूर - छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) हायवेपर्यंत विकास आराखड्यामध्ये १५ मीटरचा डी.पी. रस्त्ता आहे. त्यापैकी गौतमनगरला जोडणार्या पोचरस्त्याचे बांधकाम व काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. परंतू के. एन. कॉलेज - भिमनगर ते शांतीनगर - नागपूर - छत्रपती संभाजीनगर (औंरंगाबाद) जन्नत द्रुतगती महामार्गपर्यंत रस्त्याचे काम होणे बाकी आहे. त्या रस्त्यास निधी उपलब्ध करुन रस्त्याचे बांधकामास मंजुरात देणेबाबत परिसरातील रहिवास्यांनी लोकप्रतिनिधी, नगर परिषदचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले होते. परंतू निवेदन सादर केल्यानंतर सदर मागणी केलेल्या रस्त्याची स्थळदर्शक पाहणी केल्यानंतर लवकरात लवकर अंदाजपत्रक सादर करण्यात येईल व त्या अनुषंगाने पाठपुरावा सुद्धा करण्यात आला परंतू आजपर्यंत रस्त्याच्या कामास निधी उपलब्ध झाल्यामुळे परिसरातील नागरीकांचे मागणी स्थळ व नागरिकांचे हित लक्षात घेता दि.२५ डिसेंबर २०२३ रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांना पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख तथा कारंजा तालुका अध्यक्ष विलास राऊत यांनी सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर मंजूर करुन सुरु करण्याची मागणी केली. त्यावेळेस आमदार राजेंद्र पाटणी यांनी तेथे उपस्थित असलेले नगर अभियंता विजय घुगरे यांना सदर रस्त्याची पुन्हा स्थळदर्शक पाहणी करुन नियमानुसार रस्त्याचे अंदाजपत्रक तात्काळ सादर करणेबाबत सांगितले.
आजरोजी तालुक्यामधून ये-जा करणारे नागरीक, विद्यार्थी, विद्यार्थीनी, शेतकरी, प्रवासी वाहने शहरातील मुख्य रस्त्यावरुन ये-जा करीत असतात. त्यामुळे दिवसेंदिवस कारंजा शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता व रस्त्यावरील नागरीकांची गर्दी व वर्दळ लक्षात घेवून निवेदनातील रस्त्याचे बांधकामास मंजुरी देऊन रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यास या महावीर ब्रह्मचारी आश्रम ते दिल्ली गेट पर्यंत मुख्य रस्त्यावरची वर्दळ कमी होईल.दिवसेंदिवस रस्त्यावर होणार्या अपघाताची संख्या लक्षात घेता त्याची तीव्रता सुध्दा कमी होईल. तसेच त्या परिसरामधून कॉलेजमध्ये ये-जा करणार्या विद्यार्थी - विद्यार्थीनीं, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची विक्री करण्याकरीता येणारे शेतकरी यांना शहरातील मुख्य रस्त्याने ये-जा न करता या रस्त्याने ये-जा करणे सोईचे होईल तथा शहरातील मुख्य रस्त्यावरील वर्दळ व गर्दी कमी होवून अपघाताची तीव्रता कमी होईल. त्यामुळे सादर केलेल्या निवेदनानुसार रस्त्याचे बांधकाम संबंधित विभागास प्रस्तावित करण्याचे आदेश देवून सदर रस्त्याच्या बांधकामास निधी उपलब्ध करुन देण्यात यावा,याबाबतचे निवेदन परिसरातील नागरीकांच्या मागणीस्तव पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख तथा कारंजा तालुका अध्यक्ष विलास राऊत यांनी सादर केले.