वाशिम /कारंजा : रक्षाबंधन म्हणजे आपल्या भावाला राखी बांधून त्यांच्या कडून आपल्या सुरक्षेची हमी घेणे होय. महाभारत काळात सर्वप्रथम राजकुमारी द्रोपदीने पुरुषोत्तम श्रीकृष्णाला आपल्या शालूची पट्टी फाडून बांधली होती. आणि पुरुषोत्तम श्रीकृष्णांनी त्या पट्टीला राखी संबोधून, कौरवाच्या राजसभेमध्ये आपल्या बहिनीचे वस्त्रहरण होण्यापासून संरक्षण केले होते . या पारंपारिक इतिहासाची साक्ष म्हणून भारत भूमीमध्ये सर्वधर्मिय नागरिक बहिन भावांचे पवित्र नाते जपण्याकरीता रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा करून, आपल्या प्रत्येक बहिनीला सुरक्षेची हमी देत असतात. आणि म्हणूनच वाशिम जिल्ह्यातील युवतीसेनेच्या जिल्हाप्रमुख प्रिया महाजन यांच्या संकल्पनेतून, युवती सेना आणि शिवसेना महिला आघाडीच्या वतीने, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे हाथ मजबूत करण्याकरीता, रविवारी दि २१ ऑगष्ट रोजी, स्थानिक शासकिय विश्रामगृह कारंजा येथे रक्षा बंधना निमित्ताने शिवबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला .
यावेळी प्रामुख्याने युवतीसेनेच्या जिल्हाप्रमुख प्रिया महाजन, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख मालाताई चव्हाण, शहरप्रमुख योगीता अंगाईतकर, सारिका चतुरकर, सोनाली काठोये इत्यादी भगिनींनी आपले भाऊ वाशिम जिल्हा उपप्रमुख दत्ता पाटील तुरक, तालुका प्रमुख विलास पाटील सुरडकर, शिवसेना शहर प्रमुख गणेश बाबरे, शहर उपप्रमुख अतुल दरेकर, पं स सदस देवळे, इत्यादी शिवसैनिकांना शिवबंधनाची पवित्र राखी बांधून त्यांचे औक्षवाहन केले असे वृत्त युवती सेना जिल्हाप्रमुख प्रिया महाजन यांनी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांचे मार्फत प्रसार माध्यमाला दिले आहे .