कारंजा : श्री गुरुदेव सेवा मंडळ कारंजा, विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा, पत्रकार परिषद कारंजाच्या गुरुदेव प्रेमी गुरुदेव भक्तांनी, आज सोमवार दि. २६ डिसेंबर रोजी, सकाळी ७ : ०० वाजता श्री गुरुदेव सेवाश्रम गुरुकुंज मोझरी येथे महाराजांच्या समाधिस्थळी जाऊन दर्शन घेतले आणि सामुदायिक ध्यान केले. यावेळी गुरुदेव सेवा मंडळ कारंजा कार्यकर्त्यांमध्ये महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त समाजसेवक संजय कडोळे, पत्रकार सुनिल फुलारी, पत्रकार किरण क्षार, गणेश बाबरे, ऍड संदेश जिंतुरकर, अमोल लुलेकर, सौ चंदाताई माने, नगरसेविका सौ चंदाताई कोळकर, सौ सिमाताई सातपुते, नंदकिशोर कव्हळकर, पांडूरंग माने, गोपिनाथ डेंडूळे, दामोदर जोंधळेकर, प्रदिप वानखडे, विजय खंडार पाटील, उमेश अनासाने, सुनिल गुंठेवार इत्यादी उपस्थित होते.