वाशिम : शासनाच्या व महामंडळाच्या विविध योजना चर्मकार समाज बांधवांपर्यंत पोहचवून त्यांना त्या योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने तसेच चर्मकार समाजाचे सामाजिक उत्थान, सामाजिक समरसता तसेच चर्मकार समाजाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीकोणातून गुरु रविदास विश्व महापीठ भारत जिल्हा शाखा वाशिमच्या वतीने नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, वाशिम येथे रविवार दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता चर्मकार समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्यात महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये हे महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देणार आहे.तरी या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने चर्मकार समाज बांधवांनी उपस्थित राहावे.असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक डी.व्ही.भागवतकर यांनी केले आहे.