कारंजा (लाड) : न्यायालयीन कर्मचारी म्हणून कार्यरत दिवंगत गोंधळी लोककलाकार तथा धार्मिक आध्यात्मिक विचारसरणीचे स्व.उमेश मधुकरराव कडोळे यांचे नुकतेच निधन झाले होते.त्यामुळे त्यांचे स्मृती निमित्त मोठे भाऊ संजय कडोळे व कडोळे परिवाराकडून संत गजानन महाराज मंदिर,शहर पोलीस स्टेशन कारंजा येथे सेवा देण्यात आली. त्या निमित्त प्रातःकाळी श्रीं चा महाभिषेक व आरती करण्यात आली.तर रात्री ठिक ०८:३० वाजता श्रीं ची महाआरती करण्यात येवून महाप्रसाद (अन्नदानाचे) वितरण करण्यात आले.यावेळी कारंजाच्या आमदार सईताई डहाके यांच्या प्रतिनिधी म्हणून त्यांच्या सुनबाई सौ.तेजस्विनी ताई डहाके हजर होत्या.त्यांच्या शुभहस्ते आणि कमलेश कडोळे व सौ. सरलाताई कडोळे यांचे हस्ते महाआरती करण्यात आली. तेजस्विनीताई यांचा दि १७ जून रोजी वाढदिवस असल्याने,मंदिर सेवाधारी मंडळी कडून शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा तसेच यजमान संजय कडोळे,कमलेश कडोळे व सौ सरलाताई कडोळे यांना श्रीं ची प्रसाद रुपी शाल देण्यात आली.त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले असता जवळ जवळ पंधराशे भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.याप्रसंगी सेवाधारी मंडळाचे सुरेशराव ठाकरे,गजाननराव कडू,बिपीन वाणी,राजू असलमाल,नवघरे काका,पापडे,ह.भ.प.दिगंबर पंत महाजन,पुजारी महेश महाराज पांढरकर आदींची उपस्थिती होती.