कारंजा (लाड) (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयाचे
दिनांक 15 ऑगस्ट 2023 रोजी 76 व्या स्वातंत्र्य दिवसाचे वर्धापन दिनानिमित्त चे ध्वजारोहण दिव्यांग भुवनेश जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले.
श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयामध्ये कष्टकरी होतकरू व कर्तुत्वान दिव्यांगाच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची परंपरा जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष स्वर्गीय बाबासाहेब धाबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी 2017 पासून सुरू केली. ही परंपरा कायम राखत जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सुनील पाटील धाबेकर यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष गवई हे पुढे नेत आहेत. यावर्षी कर्तुत्वान दिव्यांग भुवनेश जोशी यांच्या हस्ते करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता. दिव्यांग भुवनेश वसंत जोशी वर्धा या ठिकाणी वास्तव्यात आहेत. त्यांना जन्म झाल्यानंतर आठव्या दिवसापासून मेंदूचा पक्षाघात झाल्यामुळे दिव्यांगत्व आले. यामुळे त्यांची उजवी बाजू कायमच निकामी आहे. ते सध्या 28 वर्षाचे असून त्यांनी अत्यंत जिद्द व चिकाटीने बी ई कॉम्प्युटर सायन्स मध्ये पदवी संपादन केलेली आहे. त्यासोबत त्यांनी मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून बीए, बीकॉम या पदव्या सुद्धा मिळविल्या आहे सोबतच कॉम्प्युटरचे अनेक कोर्स त्यांनी केले आहे. नैसर्गिक आघातामुळे दिव्यांग आल्यामुळे भुवनेश जोशी खचले नाही. त्यांनी दिव्यांगावर मात करत जिद्द व चिकाटी ने आपला शैक्षणिक प्रवास यशस्वी करून दाखविला आहे. तसेच त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे.त्यांची जिद्द व चिकाटी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाची ठरते. त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळू शकेल या भावनेतून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या अभिनव परंपरेचे ते तेरावे मानकरी ठरले आहे. यापूर्वी महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग पालकांच्या त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तुत्वान व्यक्तींच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालेले आहे. १५ ऑगस्ट २०१७ ला पारवा कोहर येथील अंध पालक रमेश डोंगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. २६ जानेवारी २०१८ रोजी पोहो येथील मुकबधीर पालक गजानन तायडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. १५ ऑगस्ट २०१८ ला मांडवा येथील अपंग पालक व कर्णबधीर आई पंचशीला बाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यातआले. १५ ऑगस्ट २०१८ ला मांडवा येथील अपंग पालक व कर्णबधीर आई पंचशीला बाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. २६ जानेवारी २०१९ रोजी भडशिवणी येथील अपंग पालक काशीराम आडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. १५ ऑगस्ट २०२० ला मांडवा येथील अपंग पालक विनोद सोनोने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. २६ जानेवारी २०२० रोजी अमरावती येथील अंध कविता पेंढारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. १५ ऑगस्ट २०२० ला कोरोन महामारीच्या काळात ग्रामीण रुग्णालय कारंजा येथील कोरोन योद्धा ठरलेल्या तीन परिचारिका विद्या भुसारे, रजनीताई गायकवाड, अलका भुसारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. २६ जानेवारी २०२१ रोजी अमरावती येथील अंधजन विकास संस्थेचे सचिव शाकीर नायक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. १५ ऑगस्ट 2021 रोजी अमरावती येथील प्रसिद्ध दिव्यांग जलतरणपटू पाणेरी पासड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. २६ जानेवारी २०२२ रोजी शेवती येथील दिव्यांग पालक कैलास राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. १५ ऑगस्ट २०२२ रोजी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी तसेच घड्याळी तासिकेवर कार्यरत असलेले प्रा. श्याम इंगोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. २६ जानेवारी २०२३ रोजी कारंजा येथील दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ समाज सेवक डॉ. गोविन्दभाऊ कासट, अमरावती येथील माजी नगरसेविका सौ. प्रभाताई आवारे, उमेश वैद्य हे सहकुटुंब उपस्थित राहणार होते. ध्वजारोहणानंतर स्वागत समारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष गवई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. दिव्यांग भुवनेश्वर जोशी व त्यांचे आई वडील, अमरावती येथील ज्येष्ठ समाजसेवक गोविंद भाऊ कासट, अमरावतीच्या माजी नगरसेविका प्रभाताई आवारे, उमेश वैद्य व ज्योती वैद्य यांचा शाल पुष्पगुच्छ पुस्तक व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य भुजंगराव वाळके, विधी ज्ञ अजय बगळे, प्रफुल्ल बानगावकर, सुरेश दवंडे, अशोकराव दहातोंडे, एम. टी. खान प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन डॉ.अशोक जाधव यांनी केले तर आभार प्रा. राहुल रडके यांनी मानले
शारीरिक विभागाचे संचालक राहुल रडके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ कैलास गायकवाड, डॉ अशोक जाधव, प्रा. उमेश कुराडे, डॉ.योगेश पोहोकार, प्रा. राहुल रडके, प्रा. पराग गावंडे, प्रा. नितेश थोरात, प्रा.मयूर वडते, प्रा. अलोलिका लोखंडे, प्रा. लक्ष्मि तेलगोटे, राजेश आढाऊ, उमेश देशमुख, प्रवीण डफडे, बाळकृष्ण खानबरड, राजू राऊत, प्रकाश लोखंडे, अरुण ईसळ, सुनील राजगुरे हे परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....