जालना:- जाफराबाद तालुक्यात दि 24/09/2024 वार मंगळवार रोजी संध्याकाळी 5.30 वाजेच्या दरम्यान जोरदार वादळ व विजेच्या कडाक्यासह मोठया प्रमाणात पाऊस आला. यादरम्यान सोनगिरी येथिल शेतकरी महिला शेतामध्ये सोयाबीन जमा करत असताना विज तिच्या अंगावर कोसळल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. कै.गीताबाई गजानन मोळवंडे वय 35 रा सोनगिरी असे मृतक महिलेचे नाव आहे.
यादरम्यान गीताबाई व त्यांचे पती नामे गजानन, तसेच त्यांची मुलगी नामे शितल हे तिघे जण शेतात सोयाबीन जमा करीत असताना विजेच्या कडाक्यासह पाऊस सुरु झाला दरम्यान अचानक गीताबाई च्या अंगावर विज कोसळली या घटनेत गीता हीचा मृत्यू झाला. मृतक महिलेच्या पश्चात पती आणि एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे