आज जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आज संपुर्ण भारतामध्ये कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्येपासून ते त्यांच्या सर्वांगीण विकासापर्यंत गेल्या ७५ वर्षापासून निरंतर कार्य करीत आलेली एक मात्र विद्यार्थी संघटना आहे.
आज कल महविद्यालय, विद्यालय परिसरात युवकांमध्ये विवीध विमर्श पसरविण्यात येत असुन एकात्मतेचे उल्लंघन करणारे कार्य होताना दिसून येत आहे. ह्या करिता युवक विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती व त्यामधून मिळणारा एकतेचा व बंधुत्वाचा संदेश पोहोचावा व येणाऱ्या विमर्षापासून स्वतःला व समाजाला कसे जागृत करावे ह्या करिता अभाविप अकोला विभागातर्फे १८ ऑक्टोंबर रोजी सामाजिक एकता यात्रेचे आयोजन करण्यात आले. ही यात्रा संपुर्ण अकोला विभागातील गावा-गावापर्यंत जाऊन युवक व समाजापर्यंत एकतेचा संदेश देण्याचा मानस पुर्ण करणार आहे.
ही यात्रेची दिनांक २३ ऑक्टोंबर रोजी कारंजा लाड येथे आगमन झाले असुन २३ व २४ ऑक्टोंबर रोजी कारंजातील विवीध शैक्षणिक संस्था व कोचिंग क्लासेस येथे त्याचे स्वागत करण्यात आले. ह्या वेळी विद्यार्थ्यांना महिती पत्रक देऊन त्यांना अभाविप कार्यकर्त्यांद्वारा एकतेचा संदेश देण्यात आला.
ह्या यात्रेमध्ये विकासार्थ विद्यार्थी विदर्भ प्रांत संयोजक निलय बोन्ते, अकोला जिल्हा संघटन मंत्री नयन सोलंकी, वाशिम जिल्हा संघटन मंत्री शुभम मुडे, कारंजा लाड नगर उपाध्यक्ष प्रा. रोहन जाधव व मंत्री रुद्र लोटे, तसेच नगर सह मंत्री ओम शेलवंटे, कार्यालय मंत्री निरज सुरटकर, SFD प्रमुख खुशी शिखरे, प्रांजली निंघोट, प्रज्वल वाघ, परिक्षीत कोल्हे इ. कार्यकर्ते उपस्थित होते.