मुंबई कोकण किनारपट्टी,पश्चिम व उत्तर महाराष्ट्र,पूर्व विदर्भात चालू आठवड्यात पावसाचा जोर काही प्रमाणात कायम असून, आज आणि उद्याही त्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.पश्चिम विदर्भात व आपल्या वाशिम जिल्ह्यात मात्र दि. ०१ जून २०२५ पर्यंत रिमझिम ते काही प्रमाणात पाऊस होणार असून,त्यानंतर दि.१६ जून पर्यंत हवामान कोरडे राहणार असल्याची शक्यता जिल्ह्यातील एकमेव हवामान अभ्यासक गोपाल पाटील गावंडे यांनी कळवल्याचे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आहे.याबाबत अधिक वृत्त देतांना,वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्याच्या ग्राम रुई गोस्ता येथील हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांच्या अंदाजानुसार त्यांनी पुढे सांगितले की,मृग नक्षत्राचे दिवशी राज्याच्या निवडक भागात काही पावसाची शक्यता असून पुढे मात्र दि.०१ जून २०२५ ते दि. १६ जून २०२५ पर्यंत मृग नक्षत्राचा पूर्वार्ध कोरडा जाण्याचीच शक्यता जास्त आहे.त्यानंतर दि.१७ जून २०२५ पासून दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे. चालू आठवड्या पासून दि. १६ जून २०२५ पर्यंत शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीच्या मशागतीची उर्वरीत कामे व बि बियाणे आणि खतांची खरेदी करून घ्यावी. त्यानंतर दमदार पावसाला सुरुवात झाल्यानंतर दि.२५ जून २०२५ पासून राज्यात पेरणीला सुरुवात होण्याचा प्राथमिक अंदाज हवामान अभ्यासक गोपाल पाटील गावंडे यांचे कडून वर्तविण्यात आला आहे.असे वृत्त शेतकरी मित्र ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले.