उरुळीकांचन: भारतरत्न डॉ बी आर आंबेडकर चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार येथील सामाजिक कार्यकर्ते लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे केंद्रीय मार्गदर्शक पदाधिकारी डॉ रविंद्र भोळे ह्यांना प्रदान करण्यात आला. सामाजिक, धार्मिक, पर्यावरण, ग्राम स्वच्छता, शैक्षणिक, अपंग सेवा , अंध अपंग, मतिमंद मूकबधिर सेवा,नैसर्गिक आपत्ती कार्ये इत्यादीं क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय समर्पित भावनेने कार्य केल्याबद्दल डॉ रविंद्र भोळे ह्यांना भारतरत्न डॉ भीमराव रामजी आंबेडकर नॅशनल प्राइड अवॉर्ड प्राप्त झाला आहे. त्यांनी पद्मश्री डॉ मणिभाई देसाई प्रतिष्ठान च्या माध्यमातून अनेक वोकेशनल कोर्सेस रोजगार निर्मिती साठी राबविलेले आहेत. राज्यभर विविध संस्थामध्ये डॉ रविंद्र भोळे कार्येरत आहेत.
वरील पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,चंद्रप्रकाश धोका निवासी मूकबधिर विद्यालय अध्यक्ष सुभाष कट्यारमल सर पेरणे फाटा, युवा भीमसेना सामाजिक संघटना कार्यकर्ते, डॉ नामदेवराव भागूजी डफळ, एल डी साळवे, देविदास कांबळे, टी के महाडीक ह्यांनी जेष्ठ प्रवचनकार, समाजसेवक, अपंगसेवक डॉ रविंद्र भोळे यांचे अभिनंदन केले आहे.