धर्माची निर्मिती प्रत्यक्ष परमेश्वराने केली असे वेदांतात सांगितले असून जगात विविध धर्मांचे धर्म संस्थापक आहेत.फक्त हिन्दु वैदिक धर्म खुप प्राचीन आहे.धर्म धारण करणाऱ्याचे रक्षण धर्म करीत असतो.पृथ्वी,आकाश,वायू,जल,अग्नी ह्या पंचतत्वानी धर्म धारण केलेला आहे.धर्म म्हणजे निती,धर्म म्हणजे विजय.दया,क्षमा,शान्ती निर्माण होण्यासाठी परमेश्वर भक्ती अत्यंत महत्वाची असते.भक्ती असेल तरच दया निर्माण होते व धर्माचे पालन होते.सात्विक त्याग,सात्विक कर्म व सत्वगुणी व्यक्तीच दया धर्म धारण करु शकते. असे मत जेष्ठ समाजसेवक,प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे महाराज यांनी येथे व्यक्त केले.सदगुरु जंगली महाराज यांच्या १३२ व्या पुण्यतिथी निमित्ताने सदगुरु जंगली महाराज ट्रस्ट च्या वतीने येथे डॉ रविंद्र भोळे महाराज यांचे दया तेथे धर्म या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले होते.यावेळी प्रवचनात ते भोळे म्हणाले की सद्गुरु जंगली महाराज यांनी अष्टांग योग साध्य करुन परोपकार केले .अविनाश हळबे यांनी डॉ रविंद्र भोळे यांचा श्रोत्यांना परिचय दिला.
याप्रसंगी शिवाजी नगर पुणे येथील अनेक मान्यवर,भाविक भक्त बहूसंख्येने उपस्थित होते.