येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दि. १५ जाने ते दि. १९ जाने २०२५ पर्यंत संगीतमय ग्रामगीता सप्ताहाचे उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. ग्रामगीतेचे वाचन दररोज सकाळी १० ते १२ व दु. ३ ते ५ या वेळेत ह.भ.प. अरुणभाऊ सालोडकर महाराज ( आजीवन प्रचारक गुरुकुंज मोझरी ) रा. अडगाव (खाकी) ता. नेर जि. यवतमाळ यांच्या अमृततुल्य वाणीतून होणार आहे. सप्ताहमध्ये दररोज सकाळी सामुदायिक ध्यान, संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना व रात्री नामवंत कीर्तनकारांची कीर्तन संपन्न होणार आहे.
यामध्ये
दि. १५ जाने रोजी रात्री ८ वा. श्री विनोदराव धोटे सर रा. कारंजा ( लाड ) यांचा वऱ्हाडी पंचरंगी कार्यक्रम संपन्न होईल.
दि. १६ जाने रोजी रात्री ८ वा. सप्तखंजेरी वादक इंजि. पवन दवंडे रा. वरुड यांचा कार्यक्रम संपन्न होईल.
दि. १७ जाने रोजी रात्री ८ वा. ह.भ.प. श्री पंकज महाराज पोहोकार (एम. ए. संगीत गोल्ड मेडलिस्ट) रा. अमरावती यांचे कीर्तन संपन्न होईल.
दि. १८ जाने रोजी रात्री ८ वा. श्री शुकदास उद्धवरावजी गाडेकर महाराज (रा. पाटसूल आश्रम जि. अकोला ) यांचा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होईल.
दि. १९ जाने रोजी सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत ग्रामगीता ग्रंथाची गावातून पालखी मिरवणूक निघेल. नंतर १० ते १२ वाजेपर्यंत ह.भ.प. अरुणभाऊ सालोडकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन संपन्न होईल. दु. १२ ते १ वाजेपर्यंत प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समारंभ व वैचारिक काला संपन्न होईल व नंतर ठीक १ वा. महाप्रसादाचा कार्यक्रम सुरु होईल.
वरील सर्व कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री गुरुदेव सेवा मंडळ तथा समस्त गांवकरी मंडळी विळेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.