स्थानिक जुना धामणगाव येथे आषाढी वारी निमित्ताने रिंगण सोहळ्याचे व दिंडीचे आयोजन करण्यात आले संत तुकाराम महाराज ,संत नामदेव महाराज संत जनाबाई , संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोयराबाई,संत गोरा कुंभार संत चोखामेळा या संतांनी सुरू केलेली वारी म्हणजे भक्तीची गंगा या भक्ती मध्ये सर्व वारकरी भूक तहान विसरून संसार विसरून एकच आस विठ्ठल दर्शनाची हीच आस डॉ. एम के.पवार शैक्षणिक संकुल येथे या दिंडीमध्ये शाळेतील वर्ग पहिली ते सहावीचे विद्यार्थी वारकरी बनवून आलेले होते .तर तुळसाबाई, कळसाबाई ,अशा विविध पेहराव करून मराठमोळे लुगडे घालून मुलींनी वारकरी सहभागी झाले सुरुवातीला दिंडीचे पूजन समन्वय जया केने व उपप्राचार्य दीप्ती हांडे, यांच्या हस्ते पूजन करण्यात आले सर्व विद्यार्थी हातामध्ये भगव्या पताका घेऊन राम कृष्ण हरी, विठ्ठल रुक्माई ,विठोबा रखुमाई ,ज्ञानोबा तुकाराम या गजरामध्ये दिंडी संपूर्ण परिसरामध्ये भ्रमण करण्यात आली .या दिंडीमध्ये सर्व शिक्षक शिक्षिका सर्व कर्मचारी सर्व विद्यार्थी सहभागी झालेले होते. सोबतच पालकही सहभागी झालेले होते .दिंडी सोहळ्यानंतर गोल रिंगण घेण्यात आले. आषाढी वारी म्हटलं की ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत सोयराबाई संत जनाबाई संत एकनाथ महाराज संत चोखामेळा गोरोबाकाका या संतांची आठवण होते आणि या सर्व पालख्या विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना होतात दिंडीमध्ये भक्ती ऊसांडून वाहते आणि यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलीचे संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे रिंगण अतिशय सुबक आणि आकर्षक असतं मन मोहून टाकणारे असते अगदी त्याच पद्धतीचे रिंगण या छोट्या बालगोपालांचं या ठिकाणी घेण्यात आलं हातामध्ये टाळ मृदुंग आणि भगव्या पथका घेऊन सर्व विद्यार्थी,शिक्षक धावत होते जणू पंढरीच अवतरली असे वाटत होते.या रिंगण सोहळ्याचे आयोजन ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी केले असून आषाढी वारीचे महत्व समजावून सांगितले . महाआरती करण्यात आली व पसायदान घेण्यात आले .