महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद वाशीम तर्फे दिल्या 'प्रशिक' च्या संचालकांना शुभेच्छा
कारंजा (लाड) : विकासासाठी, कारंजा नगरीच्या बँकींग क्षेत्रात उल्लेखनिय कामगीरी करून विश्वविक्रम करणाऱ्या, शेतकरी कल्याणकारी योजना राबविण्यात अव्वल ठरलेल्या एकमेव अशा 'प्रशिक' ग्रामिण सहकारी पतसंस्थेच्या 'अध्यक्ष' पदी कारंजा शहरातील, सेवाभावी सामाजिक कार्यकर्ते तथा सोन्या चांदीच्या ज्वेलर्सचे 'सुप्रसिद्ध व्यावसायिक' असलेल्या, 'आकाश भास्करराव कऱ्हे' यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाल्याबद्दल संपूर्ण वाशिम जिल्ह्यातून त्यांचे स्वागत व अभिनंदनाचा वर्षाव होत असून 'प्रशिक' च्या ग्राहक, खातेदार,ठेवीदार,सभासदांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. आकाश कऱ्हे यांच्या सामाजिक व सेवाभावी व्यापक कार्यामुळे निश्चितच पतसंस्थेला त्यांचा फार मोठा लाभ होणार असल्याचे बोलले जात असून,त्यांच्या व्यापक जनसंपर्कामुळे ठेविदाराच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे.आकाश कऱ्हे यांची अध्यक्षपदासाठी निवड झाल्याचे कळताच,महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिर्घानुभवी ज्येष्ठ पत्रकार तथा महाराष्ट्र ग्रामिण साप्ताहिक पत्रकार परिषद वाशीमचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी संस्थेच्या कार्यालयात जावून त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि संचालक पाडूरंगजी भगत यांची सुद्धा उपाध्यक्ष पदी वर्णी लागल्या बद्दल त्यांचे व मेघन जुमळे, प्रशांत काळे, गुलाबराव साटोटे, ओंकारराव पाढेण,सौ सुनिताताई उके इतर सर्व संचालकांचे कडोळे यांनी अभिनंदन केले. अल्पावधीतच कारंजा नगरीतील 'प्रशिक' पतसंस्थेने केवळ खातेदार,ठेवीदार यांचेपुरते मर्यादीत न राहता,शेतकरी हितासाठी धान्यखरेदी, धान्यगोदाम व शितगृहे, नागरीकासाठी एटीएम सेंटर इत्यादी नवनविन योजना राबवून कारंजेकरांचा विश्वास सार्थक ठरवीला आहे, आता तर सामाजिक चळवळीतील जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या,आकाश कऱ्हे यांची अध्यक्षपदी निवड झाली. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात 'प्रशिक' पतसंस्था आणखी विकासात्मक उपक्रम नक्कीच राबवून सभासदांना जास्तित जास्त लाभ मिळवून देणार असल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी स्पष्ट केले आहे.