वाशिम : महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री, ना.सुधिर भाऊ मुनगंटीवार हे गोंधळ जागरण हया ऐतिहासिक लोककलेचा वारसा जतन करणारे नेतृत्व म्हणून पुढे येतांना दिसत असून, यंदा त्यांच्या संकल्पनेतूनच प्रजासत्ताक दिनानिमित्ताने,दिल्ली येथील राजपथ येथे महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथावर, गोंधळी लोककलावंताच्या, मातृशक्तीच्या जागर गोंधळाचा देखावा सादर करण्यात आलेला होता. चित्ररथावरील ह्या देखाव्याला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक सुद्धा मिळाले आहे.
त्यामुळे आमचे प्रतिनिधी तथा वाशिम जिल्हा गोंधळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संजय कडोळे यांनी दिलेल्या माहिती नुसार, अखिल भारतिय गोंधळी समाज संघटनेकडून, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र गायकवाड, कार्यध्यक्ष राजेंद्र वनारसे, गोंधळी समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिवाकर बावने यांच्या नेतृत्वात प्रत्येक जिल्ह्यातील गोंधळी समाज संघटनेचे कार्यकर्ते आणि गोंधळी लोककलावंत शुक्रवार दि ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १:०० ते २:०० च्या दरम्यान,मुंबई येथील सांस्कृतिक मंत्रालयात जाऊन विद्यमान सांस्कृतिक मंत्री, ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सहृदय सत्कार करीत ऋणनिर्देश व्यक्त करणार आहेत.
शिवाय गोंधळी लोककलावंताकरिता प्रत्येक जिल्ह्यात विविध सांस्कृतिक पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करावे. आणि सांस्कृतिक विभागाकडून दिल्या जाणाऱ्या तुटपुंज्या वृद्ध साहित्यीक कलावंत मानधन वाढविण्यात यावे अशी गळ घालणार असल्याची माहिती चंद्रपूर जिल्ह्याचे गोंधळी समाजाचे नेते दिवाकर बावणे यांनी दिली असल्याचे ज्येष्ठ गोंधळी लोककलावंत संजय कडोळे यांनी सांगीतले. तरी सुद्धा सदहू कार्यक्रमात ज्या ज्या गोंधळी समाज कार्यकर्ते किंवा लोककलावंताना स्वखर्चाने सहभागी व्हायचे असेल त्यांनी " राजेंद्र वनारसे, राष्ट्रिय कार्याध्यक्ष अखिल भारतिय गोंधळी समाज संघटना मो.नं.८७९३६०५६९३ या क्रमांकावर संपर्क साधावा. सोबत आधारकार्ड व आधारकार्डाची झेरॉक्स प्रत आणि ओळखपत्र आणावे असे आवाहन करण्यात आले आहे.