अकोला-- दम्माणी नेत्र रूग्णालयाचे मुख्य व्यवस्थापक,दृष्टी दानाच्या पवित्र महान कार्यासाठी आपणा सर्वांना सोबत घेऊन सेवा साधनेत सक्रिय असणारे....अकोला जिल्हा आणि विदर्भात गरीब रूग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शिबीरं घडवून आतापर्यंत ५० हजार शस्त्रक्रियांचा उच्चांक गाठणारे मा.सभापती शुक्लसाहेब....!
त्यांच्या या सेवा कार्याचं मुल्यमापन म्हणून त्यांना मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट व डॉ .रविन्द्र भोळे आरोग्य सेवा केन्द्र आईकडून सरदार वल्लभभाई पटेल हिंदु रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना प्राप्त बहूमानाबध्दल त्यांचा *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून काल दम्माणी रूग्णालयात जाऊन त्यांचा सहर्ष सत्कार करण्यात येऊन त्यांच्या सेवाकार्याला शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्यात.
याप्रसंगी संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख, राष्ट्रीय सचिव राजेन्द्र बाप्पू देशमुख, संघटनेचे पदाधिकारी अंबादास तल्हार,के.व्ही.देशमुख सर ,पंजाबराव वर,संजयबाप्पू देशमुख,कंझारेकर, सागर लोडम,मनोहर मोहोड उपस्थित होते.