कारंजा : शुक्रवार दि.22 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 08:00 वाजता,कारंजा येथील पोलीस पाटील तथा हाडाचे सामाजिक कार्यकर्ते,अखिल भारतिय पत्रकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा दैनिक देशोन्नती वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी गोपाल पाटील भोयर यांचे हृदयविकाराने आकस्मिक निधन झाले होते.मृत्युच्या वेळी त्यांचे वय 55 वर्षे एवढे होते.त्यांच्या मृत्युनंतर त्यांचेमागे पत्नी आणि एकुलती एक लहान मुलगी असा परिवार आहे.स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून सभोवतालच्या समाजाला त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देणाऱ्या या झुंजार पत्रकाराच्या अकाली मृत्युने त्यांचा परिवार एकाकी झाला आहे.गेल्या अनेक वर्षात त्यांनी समाजाकरिता लढतांना आपल्या हजरजवाबी, प्रेमळ,मनमिळाऊ स्वभावाने कारंजेकर नागरिकांच्या मनात आदराचे स्थान मिळवीले होते. त्यामुळे त्यांच्या मृत्युबद्दल संपूर्ण कारंजा शहरातच हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या मृत्युचे वृत्त वाशिम येथे कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेन्द्र पाटणी यांना कळताच,त्यांनी शनिवार दि.23 सप्टेंबर 2023 रोजी तातडीने कारंजा शहर गाठले आणि स्व. गोपाल पाटील भोयर यांच्या कुटूंबियाचे सांत्वन करीत त्यांना दुःखातून सावरण्याकरीता धिर दिला असल्याचे वृत्त त्यांच्या निकटवर्तीयांकडून प्राप्त झाले असल्याचे महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे संजय कडोळे यांनी सांगीतले.