वरोऱ्यातील गणपती उत्सव व विसर्जन याला एक विशेष परंपरा लाभलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती स्थापना होते. मोठमोठ्या शहरांमध्ये भव्य दिव्य गणेश मूर्ती स्थापना फार पूर्वीपासून होत आहे, तशाच भव्य 13 फूट उंच अशा गणेश गणेश मूर्तीची स्थापना सत्तर वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या जय भारतीय गणेश मंडळा कडून अनेक वर्षांपासून होत आहे . मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे 13 फूट उंच अशी गणरायाची भव्य मूर्ती या मूर्ती स्थापनेचे ठिकाण एकच असून मूर्तिकार सुद्धा एकच आहे मंडळाकडून विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याप्रमाणे पन्नास वर्षापेक्षा अधिक काळापासून असलेले फ्रेंड्स क्लब गणेश मंडळ, आहे भव्य अशा गणेश मूर्तीसाठी व विविध देखावे यासाठी प्रसिद्ध असलेली 27 वर्षापूर्वी स्थापित झालेल्या गांधी चौक येथील कल्पतरू गणेश मंडळ कल्पतरू मंडळाकडून दरवर्षी दरवर्षी विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे व आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते. तसेच शहरामध्ये देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेले वीर क्लब गणेश मंडळ मित्र गणेश मंडळ मिलन क्लब गणेश मंडळ, शिवाजी गणेश मंडळ आखाड्याची परंपरा जोपासणारे हनुमान व्यायाम शाळा गणेश मंडळ ,सामाजिक कार्यात अग्रेसर असे नॅशनल गणेश मंडळ आनंदवन गणेश मंडळ प्रसिद्ध आहे. तसेच विविध सार्वजनिक गणेश मंडळ .
तसेच शहरातील विविध लहान मोठ्या मंदिरात सुद्धा गणरायाची स्थापना केली जाते. विविध दृश्य व देखावे दृश्य गणपती बसल्यानंतर पाचव्या दिवशी करायचे. त्याला रोषणाई म्हणायचे.आता ते पहिल्या दिवसापासून केले जाते.
महाराष्ट्रातील सर्व गणपती दहा दिवसा नंतर उठून विसर्जित होते. मात्र वरोरातील गणपती भाद्रपद हाडपकामध्ये 13 व्या दिवशी रात्रोला उठत असे संपूर्ण रात्रभर रॅलीमध्ये भजन,आखाडे, विविध ढोल ताशा पथक , दृश्य पेंट केलेला मनुष्याचा वाघ तसेच पूर्वी हनुमान व्यायाम शाळेचा केशव पैलवान चा तंट्या बीर तसेच हनुमान व्यायाम शाळा,कुंभार व्यायाम शाळा,बलभीम व्यायाम शाळा यांच्या आखाड्यांचा सहभाग असायचा विसर्जन स्थळी परिसरात विविध दुकाने नाश्त्याची दुकाने रात्रभर सुरू असायची संपूर्ण तालुक्यातील स्त्री पुरुष लहान बालक रस्त्याच्या दुर्दभा वरोडवरील इमारतीवर बसून रात्रभर उत्सव रॅलीचा आनंद घ्यायचे. सर्वप्रथम सुशोभीत केलेल्या रथावरील विठ्ठल मंदिर येथील मानाचे गणपतीचे विसर्जन दुपारी बारा एक चे दरम्यान व्हायचे. हनुमान मंदिराची लाकडी हनुमान जी हातावर विराजमान असलेली गणरायाची सुंदर लहान मूर्ती त्यानंतर रॅलीतील इतर मंडळाचे गणपती विसर्जन क्रमाक्रमाने व्हायचे त्यानंतर सर्वात शेवटी लहान विठ्ठल मंदिरच्या गणपतीचे सायंकाळ पावेतो विसर्जन व्हायचे आताही विसर्जनाची तीच परंपरा कायम आहे परंतु आता पूर्वी गणपती रात्र उठायचे आता ते तेराव्या दिवशी सकाळी उठून रात्र दहा अकरा वाजेपर्यंत विसर्जित होत होते.परंतु त्यानंतर शासनाने राज्यातील सर्व गणपती गणपती एकाच दिवशी दहाव्या दिवशी अनंत चतुर्थीला विसर्जन करण्याचे आदेश दिल्यामुळे सर्वात उशिरा तेराव्या दिवशी भाद्रपदामध्ये उठून विसर्जन करण्याची परंपरा खंडित झाली व महाराष्ट्रातील इतर गणपती विसर्जनासारखी अनंत चतुर्थीला विसर्जन करणे सुरू झाले. परंतु यावर्षी. मात्र अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी 18 सप्टेंबर 2024 बुधवारला विसर्जन करण्याचे ठरले त्यामुळे ते यावर्षी एक दिवस उशिरा गणपती विसर्जन होत आहे. विशेष म्हणजे गणपती उत्सवामध्ये शहरातील सर्व धर्मियांचा सक्रिय सहभाग असतो सर्व धर्मीय मिळून हा उत्सव साजरा करत असतात. संपूर्ण रॅलीमध्ये पोलीस विभाग चा बंदोबस्त व शांतता कमिटीची सतत देखरेख रहात असून प्रेक्षक व भक्तांची अलोट गर्दी अति उत्साह असला तरी संपूर्ण विसर्जन सर्वधर्मसमभावानेने शांततेत पार पडण्याची परंपरा आजही कायम आहे. विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांच्याकडून मंडळ मंडळ अध्यक्षांचे स्वागत येणाऱ्या भक्तांचे चहा पाणी तसेच नाश्ता ची व्यवस्था केल्या जाते व यावर्षी सुद्धा हीच परंपरा काय असून ठरल्याप्रमाणे अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या जय घोषाने शांततेत गणेश विसर्जन पार पडले