भद्रावती- तालुक्यातील ढोरवासा केंद्रात 50 दिवशीय कृती कार्यकम, उजळणी वर्ग प्रशिक्षण व चौथी शिक्षण परिषद नुकतीच घोनाड येथे संपन्न झाली.
भद्रावती तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. डॉ प्रकाश महाकाळकर साहेब व शिक्षण विस्तार अधिकारी मा. दिलीपजी थुल यांच्या प्रेरणेने नुकतीच घोनाड येथे झालेल्या शिक्षण परिषदेला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री प्रवीण आवारी हे अध्यक्ष म्हणून लाभले होते, प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख श्री भारतजी गायकवाड, शा. व्य. समिती सदस्य विनायक ठोंबरे, सदस्य विजुभाऊ मत्ते, उ. श्रे. मु. अ. पुंडलिक घुगल सर तर मार्गदर्शक म्हणून उर्मिला बोंडे, वंदना बोढे, मनीषा चन्नावार, राजू चौधरी व अपंग समावेशिक तज्ञ विनोद मुन हे लाभले होते.
प्रथम सत्रात कार्यक्रमाची सुरूवात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली पाहुण्यांचे स्वागत, जिल्हा परिषद शाळा घोनाड च्या नंदा महाजन मॅडम चा वाढदिवस साजरा, शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या घोनाड येथील तीन विद्याथ्यांचा सत्कार व मान्यवरांचे मनोगत झाले त्यात केंद्रप्रमुख श्री भारतजी गायकवाड यांनी कृती म्हणजे अध्यापन प्रक्रिया करून वाचन लेखन येणे हेच नव्हे तर ती कृती प्रत्यक्षात त्या विद्यार्थ्यांच्या कितपत लक्षात आली, त्या कृतीची तो अंमलबजावणी कशाप्रकारे करतो एवढेच नव्हे तर त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास, विषयावर प्रभुत्व निर्माण करणे हेच निपुण भारत अभियानाचे उद्दिष्ट आहे.
शिक्षण हे जात्यात भरडले जाणारे दळण नसून बालवयामध्ये दिले जाणारे सुसंस्कारक्षम वळण होय.
शाळा ही एक झरा आहे त्याठिकाणी विद्यार्थ्यांची तहान भागवली जाते म्हणूनच म्हणतात आधार आधाराने वेलीला वर चढावे लागते आणि कुंभाराच्या हातून मातीला घडावे लागते असे प्रतिपादन केंद्रप्रमुख मा. श्री. भारतजी गायकवाड यांनी केले.
दुसऱ्या सत्रात भाषा विषयाचे उत्कृष्ट मार्गदर्शन कृतीद्वारे जि. प. प्राथमिक शाळा चारगावच्या वंदना बोढे यांनी करून दाखविले. गणित विषयाचे उदाहरण देऊन व प्रत्यक्ष शिक्षकांकडून कृती करून घेतली ती जि. प. प्राथमिक शाळा तेलवासा च्या मनीषा चन्नावार यांनी त्यानंतर इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन प्रभावीपणे केले ते जि. प. उच्च प्राथमिक शाळा गवराळा च्या उर्मिला बोंडे यांनी. या सत्राचा सर्व शिक्षकांनी मनमुराद आनंद घेतला.
कार्यक्रमाचा शेवट वंदे मातरम नी करून सर्व केंद्रातील शिक्षकांना स्वादिष्ट जेवणाची मेजवानी देण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन त्रिरत्ना चांदेकर तर आभार प्रदर्शन सुरेश पेटकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जि. प. प्राथमिक शाळेचे मु. अ. भास्कर वांढरे, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....